
सातारा – कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांसाठी एमएच-50 डब्ल्यु मालिका सुरु करण्यात आली असून आकर्षित व पसंतीच्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कराड यांनी केले आहे. आरक्षित केलेल्या वाहन क्रमांकाची वैधता 30 दिवसांकरिता असेल. 30 दिवसाच्या आत त्या क्रमांकावर वाहन नोंदणी आवश्यक आहे. वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी आधारकार्ड, निवासाचा पुरावा व पॅनकार्ड छायांकित प्रत अर्जासोबत जोडावी.
धनगर समाजाच्या नागरिकांनी योजनांच्या माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
सातारा -आदिवासी विकास विभागामार्फत अनूसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विकासासाठी 13 योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.या योजनांच्या माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे व 02162-298106 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.