
कराड : अतुल म्हेत्रे साहेबांची कमाल, बोगस मतदारांची धमाल या प्रकारावर उपलब्ध कागदपत्रानुसार तसेच आंदोलकांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये बोगस मतदान नोंदणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या मतदारांनी अतुल म्हेत्रे साहेबांच्या जीवावर धमालच केली असून खालील तिन्ही व्यक्तीं कापील व गोळेश्वर गावचे रहिवाशी नसतानाही त्यांच्या नावांची नोंद कापील तसेच गोळेश्वर या दोन्ही गावांच्या मतदार यादीमध्ये करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
1. विनोद मोहन कदम रा. कापील व रा. गोळेश्वर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ 260 यादी भाग क्रमांक 219 कापील सिरीयल नंबर TXK7823529 तसेच यादी भाग क्रमांक 214 गोळेश्वर सिरीयल नंबर TXK7866668 यांची नोंद
2. ज्योती विनोद कदम रा. कापील व रा. गोळेश्वर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ 260 यादी भाग क्रमांक 219 कापील सिरीयल नंबर TXK7823453 तसेच यादी भाग क्रमांक 214 गोळेश्वर सिरीयल नंबर TXK7866676 यांची नोंद
3. शिवम विनोद कदम रा. कापील व रा. गोळेश्वर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ 260 यादी भाग क्रमांक 219 कापील सिरीयल नंबर TXK7823529 तसेच यादी भाग क्रमांक 214 गोळेश्वर सिरीयल नंबर TXK7865991 यांची नोंद
या तिन्ही व्यक्ती प्रत्यक्षात कापील गावचे रहिवासी नाहीत तसेच ते गोळेश्वर गावचेही रहिवाशी नाहीत. तरी या लोकांनी कापील आणि गोळेश्वर या दोन्हीही गावच्या मतदार यादीमध्ये 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकी वेळी मतदान नोंदणी करून मतदान केलेले आहे, हा मुद्दा निवडणूक नियमांतर्गत अत्यंत गंभीर स्वरूपाचा मानला जातो.
या व्यक्तींनी कापील गावामध्ये मतदान नोंदणी करताना कापील गावच्या पत्त्याचे बनावट आधारकार्ड तयार करून मतदान नोंदणी केली आहे, तर गोळेश्वर गावामध्ये मतदान नोंदणी करताना शिवम कदम याने बिना पत्त्याचे आधार कार्ड तसेच विनोद कदम, ज्योती कदम यांनी पॅन कार्ड व गौरीहर देशमुख यांच्या घराचे लाईट बिल जोडून मतदार नोंदणी करण्यात आली आहे जे Representation of the People Act 1950 मधील कलम 17 आणि 18 नुसार “द्वैमतदारत्वास मनाई” या स्पष्ट तरतुदीचे उल्लंघन ठरत आहे.
याशिवाय गोळेश्वर गावच्या मतदारांनी या तीनही व्यक्तींची नावे चुकीच्या पद्धतीने गोळेश्वरच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट झाल्याबद्दल मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे हरकत क्रमांक/एस. आर. नं. 270/2024, 271/2024 आणि 268/2024 दाखल केल्याचे नोंदीत आहे. या हरकती Registration of Electors Rules 1960 मधील नियम 13, 18 व 20 अंतर्गत दाखल करण्यात आल्या असून, हे नियम पत्ता-पडताळणी, नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया आणि दुरुस्तीची जबाबदारी स्पष्ट करतात.
या व्यक्ती कापील गावच्या रहिवाशी नाहीत, गोळेश्वर गावच्या रहिवाशी नाहीत, मग या व्यक्ती नक्की कोणत्या गावातील आहेत व त्यांनी कापील व गोळेश्वर या दोन गावांमध्ये मतदान नोंदणी करून मतदान कसे काय केले याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.
तक्रारीनुसार या तिन्ही व्यक्तींची नावे कापील व गोळेश्वर या दोन्ही गावांच्या मतदार यादीमध्ये 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान समाविष्ट करण्यात आल्याचे दाखले मिळतात आणि ही नावे मतदार नोंदणी अधिकारी अतुल म्हेत्रे साहेबांनी नोंद केलेली असल्याची नागरिकांची तक्रार आहे. Representation of the People Act 1950 मधील कलम 31 व 32 नुसार चुकीची नोंद, चुकीचा दस्तऐवज अथवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास संबंधित व्यक्तींबरोबरच प्रक्रिया पार पाडणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होते.
मतदार नोंदणी अधिकारी अतुल म्हेत्रे साहेबांच्या आशीर्वादानेच या व्यक्तींना कापील व गोळेश्वर गावचे रहिवासी नसतानाही दोन्ही ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार मिळाल्याचे दिसून येते, म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य ते कायदेशीर पाऊल उचलावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
पुढील भागात – बोगस मतदारांचा पत्ता पुराव्यांचा मेळ, नक्की कोणासाठी केलाय हा खेळ



