राज्यसातारा

बोगस कागदपत्राची चौकशी न करण्याचा मेळ, अतुल म्हेत्रेनी कुणासाठी मांडलाय हा सर्व खेळ.? (भाग नववा)

कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कापिल गावामध्ये दुबार मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत गंभीर बाबी समोर आलेल्या असतानाही त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे. की ज्या व्यक्तींना त्यांच्या मूळ गावातील मतदार यादीतील नाव कमी न करता कापिल गावामध्ये स्वतंत्र दुबार मतदार नोंदणी करायची असेल, त्यांना अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता लागत नाही फक्त आधार कार्ड वरती कापिल गावच्या मतदार यादी मध्ये मतदान नोंदणी केली जाते.

प्राप्त निवेदनानुसार, ज्या व्यक्तींना कापिल गावामध्ये दुबार मतदान नोंदणी करावयाची आहे, त्यांनी कापिल गावाच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करून संबंधित कागदपत्रांसह सहा नंबरचा ऑनलाईन अर्ज मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे सादर केल्यानंतर, त्या एका आधार कार्डाच्या आधारे कापिल गावाच्या मतदार यादीमध्ये त्या व्यक्तींची नोंद कापिल गावच्या मतदार यादीमध्ये होत असल्याचे नमूद आहे.

निवेदनामध्ये पुढे नमूद करण्यात आलेली महत्त्वाची बाब अशी आहे की, कापिल गावाच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करून त्याचा वापर मतदान नोंदणीसाठी केल्यानंतर, ते आधार कार्ड बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही यासंबंधीची चौकशी मतदार नोंदणी अधिकारी अतुल म्हेत्रे किंवा पोलीस प्रशासनामार्फत केली जात नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे, बनावट कापिल गावाच्या पत्त्याचे आधार कार्ड सादर करून मतदान नोंदणी केल्याचे सिद्ध झाल्यासही कोणतीही कारवाई होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तसेच कापिल गावाच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी केल्यानंतर ते आधार कार्ड खोटे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरदेखील, या संदर्भात त्या लोकांना भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही. कारण त्या लोकांच्या वरती तक्रार करणाऱ्या नागरिकांनीच UIDAI कडे तक्रार करून संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड खरे की खोटे याबाबत पडताळणी करावी लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. UIDAI कडील गोपनीयता धोरणामुळे वैयक्तिक माहिती इतर व्यक्तींना देता येत नाही. त्यामुळे बनावट आधार कार्ड तयार करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्यावरती फौजदारी कारवाई होईल याबाबत कोणतीही भीती वाटण्याचे कारण नसल्याचेही निवेदनात नमूद आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या सर्व प्रक्रियेचा गैरफायदा घेत कापिल गावात वास्तव्यास नसलेल्या काही व्यक्तींनी 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान कापिल गावच्या बनावट पत्त्याच्या आधार कार्डावर आधारित नोंदणी करून मतदान केल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलेली आहेत

भाग्यश्री संग्राम शिंदे,
संपदा दीपक रेवणकर,
हिंदुराव दत्तात्रय कदम,
संग्राम जयकर शिंदे,
दिपाली हिंदुराव कदम,
सुजित महेश जाधव

या व्यक्ती कापिल गावाचे रहिवासी नसतानाही कापिल गावाच्या बनावट पत्त्याचे आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी करून मतदान केलेले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यासोबतच, निवेदनात असेही नमूद आहे की वरील व्यक्तींच्या धर्तीवर आणखी काही व्यक्ती कापिल गावाच्या बनावट पत्त्याचे आधार कार्ड तयार करून त्याच प्रक्रियेने मतदान यादीमध्ये नावे समाविष्ट करून घेत आहेत. कारण या लोकांना माहित झाले आहे की बनावट कागदपत्रे असली तरीही आपणावरती कोणतीही कारवाई होणार नाही.

त्यामुळेच तक्रारदार गणेश पवार यांनी सादर केलेल्या निवेदनानुसार, सद्यस्थितीमध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या कार्यकाळात दुबार मतदार नोंदणीसाठी निर्माण झालेल्या परिस्थितीचा लाभ नागरिकांनी घेतला असून जोपर्यंत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी अतुल म्हेत्रे आहेत तोपर्यंत या संधीचा लाभ अजून लोक घेतील असे निवेदनात नमूद केले आहे.

पुढील भागात – मतदार नोंदणी अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या आशीर्वादाने एका गावाचे आधार कार्ड दुसऱ्या गावाचे मतदार

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close