ताज्या बातम्याराजकियराज्य

इंदौर मध्ये नोटाला २ लाखांहून अधिक मतं

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल सध्या समोर येत आहेत. मध्य प्रदेशातील इंदौर इथं एक वेगळाच विक्रम पहायला मिळाला आहे. यामध्ये भाजपची एकतर्फी लढत सुरु आहे. पण चक्क नोटानं त्यांना जोरदार आव्हान दिलं आहे.
कारण नोटानं २ लाखांहून अधिक मतं घेतली आहेत. या जागेवर काँग्रेसचा उमेदवार अक्षय कांती बम यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी भाजपत प्रवेश केला होता.

यानंतर अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर काँग्रेस दुसऱ्या कोणाला आपला उमेदवार बनवू शकलं नाही. पण काँग्रेसनं यासाठी भाजपलाच जबाबदार धरलं आहे. काँग्रेसनं या ठिकाणी म्हटलं की, भाजपनं इंदौरच्या मतदारांकडून त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला आहे. भाजपवर लोकशाही नष्ट करायचा आरोपही लावला होता.

यानंतर काँग्रेसनं एक अजब कॅम्पेन चालवलं आणि इंदौरच्या मतदारांना नोटाला मतदान करण्याचं आवाहन केलं. इतकंच नव्हे काँग्रेसनं शहरांमधील भिंतींवर नोटाला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. तसेच रिक्षांवरही नोटाला मतदान करण्याचं आवाहन करण्याचे पोस्टर लावले होते.

यावर भाजपनं मोठा आक्षेप घेतला होता. भाजपनं म्हटलं होतं की, काँग्रेस लोकांना नोटावर मतदान करण्यास सांगून लोकशाहीची थट्टा उडवली होती. तरीही इंदूरमध्ये काँग्रेसच्या या आवाहनाचा परिणाम पहायला मिळाला. कारण काँग्रेसच्या आवाहनानंतर नोटाला इथं २ लाख मत पडली आहेत. हा पण एक नवा विक्रमच ठरला आहे. या ठिकाणी सध्या भाजपचे उमेदवार शंकर लालवानी हे मतांच्या मोजणीत आघाडीवर आहेत पण नोटा त्यांच्या पाठलाग करत आहे. असंही सांगितलं जात आहे की मतमोजणी पूर्ण होईलप्रयंत नोटा अजून पुढे जाईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close