राज्यसातारा

वाखान परिसरात केलेल्या कारवाईतील धान्यसाठा केलेल्या व्यक्तीने धान्य शासकीय वितरणाचे नसल्याचा दिलाय जबाब ? (भाग पाचवा)

कराड : कराड तालुक्यातील वाखाण रोड परिसरात अलीकडेच पुरवठा विभागाने केलेल्या धाडीत २२२ पोत्यांचा धान्यसाठा जप्त करण्यात आल्याची घटना मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याचा गैरवापर रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले असले, तरी या कारवाईमागील तथ्यांबाबत आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. सुरुवातीला हा साठा शासकीय धान्याचा असल्याचा दावा करण्यात आला; मात्र तपासाच्या पुढील टप्प्यात समोर येणाऱ्या माहितीमुळे प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीकडून हा २२२ पोत्यांचा साठा जप्त करण्यात आला, त्या व्यक्तीने आपल्या लेखी जबाबात स्पष्ट नमूद केले आहे की संबंधित धान्य हे त्याने खुले बाजारातून खरेदी केलेले असून ते शासकीय वितरण व्यवस्थेतील नाही. या जबाबामुळे संपूर्ण कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर हा साठा खाजगी खरेदीचा असेल, तर तो शासकीय धान्य म्हणून घोषित करण्यामागील आधार काय होता, हा प्रश्न आता प्रकर्षाने पुढे येत आहे.

या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुराव्यांचा अभाव. जप्ती करताना संबंधित धान्य शासकीय असल्याचे ठोस पुरावे पुरवठा विभागाकडे होते का? जर तसे पुरावे होते, तर ते अद्याप सार्वजनिक का करण्यात आले नाहीत? तसेच, हे धान्य कोणत्या स्वस्त धान्य दुकानदारांकडून बाहेर पडले, याची नावे स्पष्टपणे का जाहीर करण्यात येत नाहीत? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे कारवाईदरम्यान संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला का, किंवा त्याच्याकडून जबाब नोंदविताना नियमांचे पूर्ण पालन करण्यात आले का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. प्रशासनाची कार्यपद्धती पारदर्शक आणि कायदेशीर चौकटीत राहिली का, हा मुद्दा आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या संदर्भात अधिकृत खुलासा न झाल्याने प्रश्न अधिकच गहिरे होत आहेत.

पुरवठा अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही आता थेट सवाल उपस्थित होत आहेत. कोणत्याही ठोस आणि पारदर्शक पुराव्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर जप्तीची कारवाई करण्यात आली असेल, तर ती केवळ अधिकाराचा गैरवापर ठरू शकते. प्रशासनाने आपल्या कारवाईचे समर्थन करताना सर्व संबंधित कागदपत्रे, पंचनामे आणि तपासाचा अहवाल सार्वजनिक करणे आवश्यक आहे, अन्यथा या कारवाईमागील हेतूवर संशय घेण्यास वाव निर्माण होतो.

या पार्श्वभूमीवर, संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे बनले आहे. सत्य काय आहे, हे जनतेसमोर यायला हवे धान्य खरोखर शासकीय होते की खाजगी खरेदीचे, कारवाई योग्य होती की घाईघाईत करण्यात आली, आणि संबंधित व्यक्तीवर कोणताही अन्याय झाला का. या सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळेपर्यंत वाखाण रोडवरील २२२ पोत्यांचे प्रकरण शांत बसणारे नाही, एवढे मात्र निश्चित.

पुढील भागात – वाखाण धान्य प्रकरणात नवा ट्विस्ट, बाहेरून खरेदी दाव्याने प्रशासनाची कोंडी ?

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close