ताज्या बातम्याराजकियराज्य

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून सर्वात मोठा दिलासा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी अभूतपूर्व असा मोठा भूकंप बघायला मिळाला होता. या राजकीय भूकंपाने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण हादरलं होतं.

या भूकंपाचे पडसाद सातत्याने बघायला मिळाले. तसेच आताही बघायला मिळत आहेत. तसेच आगामी काळातही बघायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या राजकीय भूकंपाच्या घटनेची इतिहासाच्या पानांवर ठळक अक्षरांमध्ये नोंद होणार आहे. ही घटना म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात पडलेली सर्वात मोठी फूट. या पक्षफुटीमुळे शिवसेना पक्ष चक्क दोन भागांमध्ये विभागला गेला. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेना दोन गटात विभागली गेली. यानंतर सर्वच गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने गेल्या. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळालं. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचं सर्वाधिक पाठबळ हे एकनाथ शिंदे यांनाच मिळालं. निवडणूक आयोगात ठाकरे गटाला सातत्याने निराशा मिळाली. पण आता पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला यापुढे निधी स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारता येणार आहे. खुद्द केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटात आनंदाचं वातावरण आहे. निवडणूक आयोगाने नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालादेखील निधी स्वीकारण्यास मंजुरी दिली होती. शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनीदेखील निवडणूक आयोगात याबाबतची मागणी केली होती. उद्धव ठाकरेंची ही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात सध्या प्रचंड हालचाली सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला चांगलं यश मिळालं. काही ठिकाणी अतिशय थोड्या फरकाने ठाकरे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला. लोकसभेच्या निकालानंतर ठाकरे गटात उत्साह संचारला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जवळपास 100 जागांवर निवडणूक लढवावी आणि सर्वाधिक जागा जिंकून आणाव्यात यासाठी ठाकरे गटात रणनीती आखली जात आहे. जिथे आपल्या पक्षाचा चांगला प्रभाव आहे तिथे आपला उमेदवार उभा करायचा असा ठाकरे गटाचा प्लॅन आहे. ठाकरे गटाकडून याबाबतची रणनीती आखण्यासाठी आतापर्यंत दोन महत्त्वाच्या पक्षांतर्गत बैठका देखील घेण्यात आल्या आहेत. तसेच आगामी काळात आणखी बैठका होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागांवर यश मिळवण्यासाठी ठाकरे गट चांगलीच कंबर कसताना दिसत आहे. असं असताना आता निवडणूक आयोगानेदेखील ठाकरे गटाला दिलासा दिला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close