ताज्या बातम्याराज्यसातारा
इंदोरीकर महाराजांना संगमनेर न्यायालयाकडून जामीन मंजूर

संगमनेर : अपत्यप्राप्तीबद्दल केलल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना मोठा दिला मिळाला आहे. संगमनेर न्यायालयाकडून इंदोरीकर महाराजांना जामीन मंजूर झाला आहे. पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत इंदोरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंदोरीकर महाराजांनी सुनावणीच्या एक दिवस आधीच स्वत: कोर्टात हजर राहून जामीन घेतला.
24 नोव्हेंबरला इंदोरीकर महाराजांच्या जामीन अर्जावर सुनावणी होती, पण यादिवशी इतर जिल्ह्यात नियोजित कीर्तन असल्यामुळे इंदोरीकर महाराजांनी कोर्टाला विनंती केली होती. ही विनंती मान्य करत कोर्टाने इंदोरीकरांना जामीन मंजूर केला. 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर इंदोरीकर महाराजांचा जामीन मंजूर करण्यात आला. इंदोरीकर महाराजांचे वकील अॅड.के.डी धुमाळ यांनी ही माहिती दिली.