
कराड : कराडमध्ये मध्यवर्ती इमारतीत अनेक शासकीय कार्यालय असून चक्क निवडणूक कार्यालयाने वेगळेच फर्मान काढलं असल्याने आता चर्चेत आले आहेत. या फर्मानामुळे निवडणूक कार्यालय सेवा देण्यासाठी आहे की देवाचं मंदिर आहे, असा सवाल सामान्य नागरिकांकडून केला जाऊ लागला आहे.
कराडच्या मध्यवर्ती बिल्डिंग मध्ये तब्बल 25 ते 26 शासकीय कार्यालय आहेत. यामध्ये तालुक्याचे प्रमुख असलेले प्रांत, तहसील कार्यालयासह कृषी तसेच अन्यही कार्यालय आहेत परंतु कोणत्याही कार्यालयात जाताना कोणतीही सूचना किंवा बंधन घातली गेले नाहीत. मात्र याच मध्यवर्ती बिल्डिंगमध्ये निवडणूक शाखेचा कार्यालय आहे तेथे चक्क कार्यालयात प्रवेश करायचा असेल तर आपली पादत्राणे बाहेरच काढावीत असा फलक लावला गेला आहे. त्यामुळे निवडणूक शाखेत येणाऱ्या नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असून याबाबत वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
केवळ या ठिकाणी फलक लावला गेला नाही तर यापुढे जाऊन तुम्ही तुमची पादत्राणे चप्पल बूट कार्यालयात घालून आल्यास तुम्हाला आवश्यक असणारी माहिती तिथे मिळणार नसल्याचा दमच अधिकाऱ्यांकडून भरला जात आहे त्यामुळे नक्की निवडणूक कार्यालय हे सेवा देण्यासाठी आहे की देवाचं मंदिर आहे असा सवाल सामान्य येणाऱ्या नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.