
कराड : कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे हे सर्वसामान्य लोकांची कामे लवकर आणि एका जागेवर व्हावी त्या उद्देशाने कराड उत्तर मधील प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक महिन्यात जनता दरबार घेत असतात. त्याचप्रमाणे रहिमतपूर येथे नगरपालिका हद्दीमध्ये आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम, संपत माने, वासुदेव माने, रणजीत माने, विक्रम माने यांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबार आयोजित केलेला होता.
या जनता दरबारामध्ये रहिमतपूर मध्ये वास्तव्यास असणारा गोसावी समाज हा त्यांना हक्काची दफन भूमी मिळावी हा प्रश्न घेऊन आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्याची ही मागणी सातत्याने चालू होती परंतु त्यांच्या मागणीला यश येत नव्हते. जनता दरबारामध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नावरती जागेवरच अंमलबजावणी करण्याच्या सूचना आमदार साहेबांनी दिल्यानंतर रहिमतपूर नगरपालिका हद्दीतील दोन गुंठे जागेचे हस्तांतरण गोसावी समाजाला दफनभूमीसाठी करण्यात आले त्याची दास्तावेज त्यांना प्रदान करण्यात आली.
यावेळी शिवाजी शिंदे, विठ्ठल मोरे, आकाश जाधव, रोहित शेटे, अमोल मोरे, राहुल जाधव, गणेश घाडगे आदी उपस्थित होते. यामुळे संपूर्ण गोसावी व इतर समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनता दरबारामुळे सामान्य लोकांची कामे जलद गतीने होत असून प्रशासनही चांगल्या पद्धतीने काम करत आहे. जनता दरबार कायमस्वरूपी चालू राहावेत अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.