राज्यसातारा

वाठार किरोली येथे आ. मनोज घोरपडे यांच्या जनता दरबारात 290 तक्रारीवर ऑन दि स्पॉट फैसला

कराड : उत्तर  विधानसभा मतदारसंघातील  एकाही नागरिकाचा प्रश्न प्रलंबित राहू नये, त्याला कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतदार संघात  बऱ्याच वर्षांचे प्रलंबित असलेले प्रश्न जनता दरबाराद्वारे सुटलेले पाहायला मिळतेय. खरंतर लोकांनी आपल्याला प्रतिनिधित्व देताना या गोष्टी अपेक्षित होत्या. त्यागोष्टी पूर्ण करण्यामध्ये मला सुद्धा एक वेगळा अनुभव लॉ सॅटिसफॅक्शन या माध्यमातून मिळताना दिसत असल्याचे प्रतिपादन कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केले.
 वाठार (किरोली) येथील श्री अंबामाता मंदिर सभामंडपामध्ये आमदार मनोजदादा घोरपडे  यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारास सुरुवात झाली. यावेळी जि. प. माजी कृषी सभापती भीमरावकाका पाटील, प्रांताधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, पंचायत समिती गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, सार्वजनिक बांधकाम (जि. प.) उपअभियंता श्रीमती रेहाना मुल्ला, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, सिताराम गायकवाड (आप्पा), विकासअण्णा गायकवाड, चंद्रकांतअण्णा गायकवाड,तात्यासो साबळे,विकास राऊत, सुरेशदादा गायकवाड, आनंदराव गायकवाड, गणेश गायकवाड, सर्व प्रशासकीय खातेप्रमुख यांच्यासह वाठार (किरोली) पंचक्रोशीतील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
जनता दरबारामध्ये 389 तक्रारी दाखल झाल्या होत्या त्यापैकी 290 तक्रारीवर ऑन दि स्पॉट फैसला झाला. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या जनता दरबारामध्ये आपले प्रश्न जागेवर सुटल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. उर्वरित तक्रारी प्रलंबित असून त्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश आ. मनोज दादा घोरपडे यांनी दिले आहेत.
जनता दरबाराच्या यशस्वीतेसाठी भाजप प्रदेश कार्यकारणी निमंत्रक सदस्य विकास गायकवाड,  पंढरीनाथ गायकवाड, जालिंदर गायकवाड, सुनील पवार, पांडुरंग खिलारे, संजय मुळे, समाधान पवार, योगेश भंडलकर, सुरज गुजले, विकास पवार, तुषार राक्षे यासह अन्य युवा वर्गाने परिश्रम घेतले.
प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेऊन सोडविल्या 
वाठार (किरोली) सज्जातील  प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने मर्यादित जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार आमदार मनोज दादा घोरपडे  हे प्रत्येक नागरिकाचे म्हणणे जाणून घेत होते, सादर केलेली कागदपत्रे तपासून पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देत होते. सकाळी 11 वाजता सुरू झालेला जनता दरबार तब्बल  सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होता. यावेळी वाठार (किरोली) पंचक्रोशीतील  नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या आणि सोडवून घेतल्या. एकूणच जनता दरबारात गेल्याने आपले प्रश्न सुटले, ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.
भूमी अभिलेख विभागाच्या कारभारात सुधारणा करणार..
कराड उत्तर मतदार संघात शेतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. जनता दरबारात शेतकऱ्यांनी हजेरी लावत महावितरण व महसूल विभागाच्या कामकाजाविषयी तक्रारी मांडल्या. मात्र भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी प्रक्रियेत होत असलेली चालढकल, मोजणी झालेल्या प्रकरणांमध्ये हद्दी निश्चित न करणे, मोजणीचे नकाशे उपलब्ध करून न देणे, मोजणीसाठी तारीख न नेमणे, मोजणी झालेली प्रकरणी न सापडणे आदी तक्रारींचा पाढाचं जनता दरबारात मांडण्यात आला. यावर आमदार मनोज दादा घोरपडे यांनी कोरेगाव कार्यालयात चांगले कामकाज व्हावे, यासाठी नव्याने कर्मचारी नियुक्त करण्यात येतील अशी स्पष्ट पणे  ग्वाही दिली. 
 
वादळाला त्याचा परिचय देण्याची गरज नसते त्याची चर्चाही आपोआप होतच असते.
जनता दरबारात चिमुकल्याने माळी वस्तीवर विद्यमान आमदारांची भेट अनमोल असून दिलेले आश्वासन लाख मोलाचे असल्याचे सांगितले. तर  उपस्थित वयोवृद्ध नागरिकांने आपली समस्या मांडताना सकाळी सुरू झालेला जनता दरबार सायंकाळ झाली तरी अखंडपणे सुरू आहे. मला खात्री आहे मतदार संघातील बहुसंख्य प्रलंबित प्रश्न  हेच नेतृत्व सोडवू शकते, असा विश्वास निर्माण करण्यात आमदार मनोज घोरपडे यशस्वी झाल्याचे आपल्या थरथरत्या आवाजात सांगताच  उपस्थितांमधून  टाळ्यांचा कडकडाट झाला.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close