
कराड ः फलटण येथील यशवंत बँकेत 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगाकर यांच्यासह 50 जणांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालवधीत झालेल्या लेखापरीक्षण व 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2024 अशा लेखापरीक्षण पूर्व कालवधीत कार्यरत असलेल्यांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे. पुण्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.
सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर, संचालक नरेंद्र भोईटे, रविंद्र टोणपे, चंद्रकांत चव्हाण, अनिल चव्हाण, सुनील पावसकर, सुधीर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी, अवधूत नाटेकर, डॉ. नचिकेत वाचासुंदर, चंद्रकांत कुलकर्णी, गणपतराव निकम, नानासो पवार, पांडुरंग करपे, नितीन रेडेकर, स्नेहन कुलकर्णी, कल्पना गुणे, लक्ष्मण सपाटे, महेशकुमार जाधव, अजित निकम, नानासाहेब पवार, गोपीनाथ कुलकर्णी, संदीप इंगळे, जयवंत जगदाळे, डॉ. प्रदीपकुमार शिंदे, प्रसाद देशपांडे, सुहास हिरेमठ, परशराम जंगाणी, अनघा कुलकर्णी, विशाल शेजवळ, प्रमोद गिजरे, वसंतराव बोराटे, सुनील मुन्द्रावळे, नीलिमा कुलकर्णी, रेखा कुलकर्णी, सचिन साळुंखे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, धनंजय डोईफोडे, वैशाली मोकाशी, शाखा व्यवस्थापक वैशाली पावशे, केशव कुलकर्णी, चरेगावकर यांचे भाऊ शार्दूल उर्फ मुकुंद चरेगांवकर, विठ्ठल उर्फ शौनक कुलकर्णी, राही कुलकर्णी, संहिता कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, काशिनाथ कुलकर्णी, सुरज गायधनी, विभिषण सोनावणे, दिनेश नवळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे.
9 ऑगस्ट 2014 ते 31 मार्च 2025 यादरम्यान यशवंत बँकेचे अध्यक्ष, कर्मचारी व संचालकांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी बँकेचे आर्थिक नुकसान केले. परस्पर संगनमताने 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 एवढ्या रक्कमेचा त्यांनी अपहार केला. त्यासाठी बोगस कर्ज प्रकरणे करून या प्रकरणांसाठी खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली. कर्जास तारण न घेता हेतुपुरस्सर कर्ज वितरण करून जुनी थकीत खाती बंद दाखवून नवीन खाती उघडली. त्याद्वारे निधीचा उद्देशबाह्य विनियोग करून तृतीय पक्षांकडे निधी वळवला. तसेच दस्तऐवजांत फेरफार व खोट्या नोंदी तयार करून बँकेच्या निधीचा गैरविनियोग करून अपहार केल्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
Tags
Karad Yashvant bank