राज्यसातारा

संग्रामबापू घोरपडे यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव 

कराड : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे व उद्योजक विक्रम घोरपडे यांचे बंधू संस्थापक, अटलांटा उद्योग समूहाचे संस्थापक व खटाव- माण साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक युवा नेते संग्राम घोरपडे यांचा वाढदिवस गुरूवारी उत्साहात साजरा झाला.

मत्त्यापूर (ता. सातारा) येथे सकाळी वडील (कै.) भीमराव घोरपडे यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केल्‍यानंतर आई मंगलताई व कुटुंबीयांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन खंडोबाची पाल येथील खंडेरायाला अभिषेक, लाडू तुला करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मसुर येथील जिल्हा परिषदेत शाळा, बी. के. इंग्लिश मिडियम स्कुल, पाल, रणजीत कौर गडोख विद्यालय अतित येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप, भवानवाडी (चरेगाव) येथे नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर, नागठाणे व खटाव- माण साखर कारखान्यावर रक्तदान शिबिर, निसराळे येथील साहस विशेष बालक वस्तीगृहात खाऊ वाटप, उंब्रज येथे बॅटमिंटन स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत मत्त्यापूर येथील निवासस्थानी त्‍यांना शुभेच्‍छा देण्‍यासाठी नेतेमंडळींसह मतदारसंघातील कार्यकर्त्यांची रीघ लागली होती.

यावेळी श्री. घोरपडे यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार आनंदराव पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, सुरेश पाटील, महेश जाधव, वासुदेव माने, बाबासाहेब घोरपडे, यशवंत ढाणे, माधवराव गुरव, विजयाताई गुरव, बजरंग जाधव, संतोष पाटील, दिगंबर भिसे, जयवंत जाधव, मोहन माने, निवासराव निकम,  नयन निकम, महेश चंदुगडे, अनिल माने, रणजीत पाटील, जगन थोरात, वैभव चव्हाण, उमेश मोहिते, राजेंद्र मोहिते, शरद घोलप, दिनकर पाटील, जयवंतराव जगदाळे, संपतराव इंगवले, शुभम चव्हाण, अमोल पवार, कृष्णत शेलार, महेश चव्हाण, राहुल पाटील, तुकाराम नलावडे, राजन पाटील, विनोद डूबल, निलेश डूबल, संभाजी पिसाळ, श्रीकांत पिसाळ, सचिन पवार, विठ्ठल काकडे, सुधीर शेळके, प्रशांत कणसे, ॲड. धनाजी जाधव, बबन माने, अधिक सावकार, सचिन घाडगे, अण्णासाहेब निकम, राजू मोरे, अभिजीत घोरपडे, विकास राऊत, विकास गायकवाड, बाळासाहेब माने, सुरेश माने, अविनाश जाधव, विलास जाधव, रंजीत माने, तुषार माने, नेताजी भोसले, सोमनाथ निकम, राजू घाडगे, तुषार जाधव, विजय जाधव, सुनील मलवडकर, सुधीर जाधव कऱ्हाड उत्तर मधील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close