
कराड : कराड तहसील कार्यालयातील निवडणूक शाखा सध्या चर्चेचा विषय बनले आहे कराड दक्षिण मध्ये वाढलेली बोगस मते आणि यावर अधिकाऱ्यांची उडवा उडवीची उत्तरे यामुळे निवडणूक शाखा बदनाम झाली आहे त्यातच आता निवडणूक शाखेमध्ये झेरॉक्स मशीन मध्ये झालेला घोटाळा याबाबत सुरू असलेली कुजबूज यामध्ये नक्की कुणाकुणाचे हात बरबटले आहेत हे लवकरच येणाऱ्या काळात समजेल.
कराड तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये खरेदी करण्यात आलेली झेरॉक्स मशीन सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या मशीनची अधिकृत किंमत ₹1,10,000 रुपये दाखवण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ती केवळ ₹58,000 रुपयांमध्ये आणल्याची चर्चा कार्यालयीन आवारात जोरदारपणे सुरू आहे.
तसेच यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे ते आणलेली मशीन निवडणूक शाखेमध्ये नसून दुसऱ्या शाखेमध्ये ठेवण्यात आली आहे व सध्या निवडणूक शाखेमध्ये असणारी मशीन ही एका अधिकाऱ्याच्या नावावरती घेतलेली मशीन आहे असे बोलले जात आहे. निवडणूक शाखेमध्ये असणारी ही झेरॉक्स मशीन एका अधिकाऱ्याच्या नावावर असलेली मशीन घेण्याचे कारण काय याबाबत ही वरिष्ठांनी खुलासा करावा अशी मागणी होत आहे.
तसेच निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीच्या कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणात कागदपत्राचे झेरॉक्स मारल्या जातात व त्या कागदपत्राच्या झेरॉक्स त्या अधिकाऱ्याच्या नावावरती असणाऱ्या झेरॉक्स मशीन वरती मारल्या जातात व त्याचे बिल भानगडी करून काढले जाते असे बोलले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. “शासकीय निधी ही लोकांची मालमत्ता आहे; ती अशा प्रकारे लाटण्याचा प्रयत्न कोणीही केल्यास त्याला शिक्षा झालीच पाहिजे,” असा संताप लोकांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, तहसील कार्यालयातील या भानगडी बाबत नागरिक आता या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी व निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी करीत आहेत.
लवकरच – निवडणूक शाखेतील त्या अधिकाऱ्याच्या इतर भानगडी