निवडणुकीअगोदर उद्धव ठाकरेंना पहिला धक्का

नाशिक : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यादरम्यान या निवडणुकीअगोदर उद्धव ठाकरेंना पहिला धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत संजय राऊतांची भेट घेणाऱ्या नेत्याने उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. बंडूकाका बच्छाव असे या नेत्याचे नाव आहे.
बंडूकाका बच्छाव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत मालेगाव बाह्यमधून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. निर्धार मेळावा घेऊन बंडूकाका बच्छाव यांनी याबाबतची घोषणा केली. बंडूकाका बच्छाव यांच्या निर्धार मेळाव्याच्या व्यासपीठावर भाजपचे नेते सुनिल गायकवाड हेदेखील उपस्थित होते.
मालेगावमधल्या रेणुका सूत गिरणी कर्ज प्रकरणी अद्वय हिरे यांना अटक करण्यात आली होती. यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये जामीन मंजूर होताच अद्वय हिरे 9 महिन्यांनंतर जेलच्या बाहेर आले. कारागृहातून बाहेर येताच अद्वय हिरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली होती. यानंतर अद्वय हिरे यांना मालेगाव बाह्यमधून उमेदवारी मिळणार हे समजल्यानंतर बंडूकाका बच्छाव यांनी बंड करत मालेगाव बाह्यमधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.