
कराड : तालुक्यातील किल्ले वसंतगड छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासातील शाैर्याची प्रेरणा लाखो मावळ्यांना आणि मराठ्यांना आज देत आहे, दिवाळी सण आणि शिव प्रतापदिनाचे आैचित्य साधून दिप महोत्सावचे आयोजन करण्यात आले. या महोत्सावाला शिवप्रेमी आणि कराड तालुक्यातील मावळ्यांनी उपस्थिती लावली. याठिकाणी ‘एक दिवा माझ्या राजासाठी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र झगमगाटात असून धनत्रयोदिवशी किल्ले वसंतगडावर शेकडो दिप लावण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत दिपत्सोव साजरा करण्यात आला. गडावरील श्री चंद्रसेन महाराज मंदिर परिसरात उपस्थित मावळ्यांनी दिप लावत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या घोषणा दिल्या.
किल्ले वसंतगडावरील सुस्थितीत असलेले बुरूंज आजही इतिहासाची आठवण करून देत असून बंदिस्त तटबंदी आहे. या गडावर वसंतगड आणि तळबीड येथील ग्रामस्थ ग्रामदैवत श्री चंद्रसेन महाराज यांच्या दर्शनासाठी दर रविवारी मोठी गर्दी करतात. तसेच महाराष्ट्रातील इतिहास प्रेमी, शिवप्रेमी या गडाला आजही भेट देवून इतिहास जाणून घेतात. तसेच स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते आणि महाराणी ताराराणी यांचा इतिहास याठिकाणी अभ्यासासाठी इतिहास संशोधक भेट देत असतात.