शरद पवारांनी महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्मांना बरोबर घेऊन राजकारण केले : जयंत पाटील

मुंबई : लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे, भाजपचीही जोरदार तयारी सुरू असून भाजपमधील दिग्गज नेत्यांनी दौरे सुरू केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून काल त्यांनी जळगावात सभा घेतली.
या सभेत त्यांनी खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. “शरद पवारांना महाराष्ट्राची जनता गेल्या ५० वर्षांपासून सहन करतेय”, अशी टीका त्यांनी केली, या टीकेला ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“५० वर्ष महाराष्ट्राला शरद पवार यांचे एक स्वप्न, एक तरुण शुन्यातून जग निर्माण करणारा ते इथंपर्यंतचा प्रवास महाराष्ट्राने त्यांचा बघितला. महाराष्ट्राने त्यांना साथ दिली. सहन करण्याचा कधीच प्रश्न उद्भवला नाही, त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्मांना बरोबर घेऊन राजकारण केले म्हणून त्यांना आज शरद पवार म्हणतात, असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी अमित शाह यांच्या टीकेला दिले.
“महाराष्ट्रातील आज सर्व मान्यता आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून मानतात त्यांना पाठिंबा देतात. आजही ते सर्वांना हवेहवेसे वाटतात, असंही जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्रात सर्वात मोठी ताकत शरद पवारांची आहे, प्रतिमा मोठी आहे, महाराष्ट्र त्यांनाच मानतो त्यामुळे अशा गोष्टी होणे स्वभाविक आहे, ‘शरद पवार यांनी कृषीमंत्री असताना केलेले काम, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचे काम तसेच किल्लारी येथे झालेल्या भूकंपानंतरचे काम महाराष्ट्र विसरलेला नाही, असंही पाटील म्हणाले.