राजकियराज्यसातारा

गोकूळ तर्फ हेळवाक येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मान्यता

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नांना यश

पाटण : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,सांगली कोल्हापूर व कोकण भागामध्ये प्रतिवर्षी येणाऱ्या आपत्तींना सामोरे जाणेसाठी तसेच आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे सातत्याने मागणी केली होती.दरम्यान महसूल व वन विभागाचे दि.23.05.2023 रोजीच्या शासन ज्ञापनान्वये राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी मौजे गोकूळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथील 38.93 हेक्टर आर क्षेत्र गृह विभागास प्रदान करण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली होती. तर राज्य शासनाचे गृहविभागाने दि. 04 डिसेंबर 2023 रोजी पारित केलेल्या शासन निर्णयानुसार गोकूळ तर्फ हेळवाक येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक पदनिर्मिती, साधनसामुग्री व वाहन खरेदी आणि इमारत बांधकाम इत्यादीबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यास मंजूरी दिली असून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नाने राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी मौजे गोकूळ तर्फ हेळवाक(कोयनानगर) येथील 38.93 हेक्टर आर क्षेत्रावर लवकरच राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र या दोन कार्यालयांची उभारणीचे कामकाजाला सुरुवात होणार आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तसेच कोयना धरणाचे पाण्यासाठयाचे विसर्गामुळे प्रतिवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होत असून दळण वळण ठप्प होऊन येथील नागरीकांचे मोठया प्रमाणांत हाल होत असतात. या फटका पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्हयांना प्रतिवर्षी बसून महापूर परिस्थिती निर्माण होत असते. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हांतील समुद्र किनार पट्टीच्या भागात चक्रीवादळाने आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होत असल्याने या भागात तातडीने मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल तात्काळ उपलब्ध होण्याचे दृष्टीने पाटण विधानसभा मतदारसंघातील गोकूळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासंदर्भात ना.शंभूराज देसाई हे यापुर्वीच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री असताना सातत्याने आग्रही होते. त्याच पार्श्वभूमीवर ना. शंभूराज देसाई यांनी महसूल व गृह विभागाच्या सर्व संबंधित अधिकारी यांचेसमवेत सदर राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारावयाच्या प्रस्तावीत गोकूळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथील जागेची पाहणी करुन या ठिकाणी सदरची दोन्ही शासकीय कार्यालये उभारण्यास मंजूरी मिळण्याकरीताचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाचे संबंधित विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही ना.शंभूराज देसाई यांनी केल्या होत्या. तद्नंतर ना.शंभूराज देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयीन स्तरावर संबंधित शासकीय विभागाच्या बैठकाही झाल्या होत्या. पाटण तालुका भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने आणि कोकण विभागातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील समुद्रकिनार पट्टीच्या भागात चक्रीवादळाने आपत्तीजनक परिस्थिती उद्भवत असल्याने या भागात तातडीने मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल व सद्यस्थितीत पोलीस प्रशिक्षण केंद्रांची मोठी मदत होणार असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपदग्रस्तांना कमी कालावधीमध्ये तात्काळ सेवा देण्यासाठी याचा फायदा होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र व कोकणासाठी महत्त्वाची दोन कार्यालये होणार
पाटण विधानसभा मतदारसंघ हा डोंगरी व दुर्गम भागात वसलेला अतिवृष्टीचा व भूकंपप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो.प्रतिवर्षी मतदारसंघात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे तसेच अतिवृष्टीच्या कालावधीत कोयना धरणातून मोठया प्रमाणांत होणाऱ्या विसर्गाने पश्चिम महाराष्ट्रातील सातारा,सांगली व कोल्हापूर जिल्हयात पूर परिस्थिती निर्माण होत असते. तर कोकण विभागातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील समुद्रकिनार पट्टीच्या भागात चक्रीवादळाने व अतिवृष्टीमुळे आपत्तीजनक परिस्थिती उद्भवत असते.या आपत्काली परिस्थितीमध्ये तात्काळ मदत होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण विभागाच्या मध्यतर्वी असलेल्या गोकूळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) या ठिकाणी ना.शंभूराज देसाई यांचे दूरदृष्टीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र या दोन शासकीय कार्यालये होणार आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close