ताज्या बातम्याराजकियराज्य

एकाच वेळी थाळ्या वाजवणे, दिवे लावतात तेव्हा एकतेची अनुभूती मिळते : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांशी परीक्षेबाबत चर्चा केली. दिल्लीतील भारत मंडपम येथे हा कार्यक्रम झाला. देशभरातील विद्यार्थ्यांनीही व्हर्च्युअल माध्यमातून या चर्चेत सामील होऊन पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले.

आपल्या समस्या सांगितल्या. त्यानंतर मोदींनी मुलांना विविध उदाहरणं देऊन समजावून सांगितलं की, तुम्हाला परीक्षा वॉरियर बनायचं आहे, परीक्षा वरियर नाही. तसेच पंतप्रधानांनी भारताच्या कोरोना विरुद्धच्या युद्धाचं उदाहरण दिलं आणि कठीण प्रसंगांना धैर्याने कसं तोंड द्यायचं हे देखील सांगितलं.

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मुलांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या काळात लोकांना थाळ्या वाजवायला का सांगितलं होतं?, कोरोना वॉरियर्सच्या नावाने दिवे लावायला का सांगितलं? याबाबत खुलासाही केला आहे. 2020 मध्ये कोरोनाच्या काळात लोकांना थाळ्या वाजवण्यास सांगण्यात आलं होतं. यामागचं कारण आता 4 वर्षांनंतर समोर आलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, थाळ्या वाजवल्याने किंवा दिवा लावल्याने कोरोनापासून दिलासा मिळत नाही, हे मला माहीत आहे. यामुळे कोरोनाचा आजार बरा होत नाही. पण कोरोनाविरुद्धच्या युद्धात देशातील जनतेला एकत्र आणण्यासाठी हे केलं. जेव्हा संपूर्ण देशातील लोक एकाच वेळी थाळी वाजवतात आणि एकाच वेळी दिवे लावतात तेव्हा एकतेची अनुभूती मिळते. आपण एकटे कोरोनाशी लढत नसून संपूर्ण देश कोरोनाचा सामना करत आहे. सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला तरच अडचणीतून बाहेर पडता येईल.

कोरोना ही जागतिक महामारी आहे. यामुळे सर्व जग त्रस्त झालं होतं. मी काय करू शकतो? असं मी देखील म्हणू शकलो असतो. पण मी तसं केलं नाही. मला वाटलं मी एकटा नाही. देशात 140 कोटी लोक आहेत. सर्वांनी एकत्र येऊन या समस्येला तोंड दिल्यास या समस्येवर मात करू. म्हणूनच मी टीव्हीवर येत राहिलो. लोकांशी बोलत राहिलो. त्यामुळेच परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुम्ही कधीही घाबरू नका, आपल्याला त्याचा सामना करावा लागेल आणि विजयी व्हावे लागेल असं पंतप्रधान मोदींनी मुलांना सांगितलं.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close