राज्यसातारासामाजिक

आजी-माजी सैनिकांचे तारणहार : मा. तहसीलदार श्री. विजय पवार साहेब

कराड तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय श्री. विजय पवार साहेब यांचा आज सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा..

कराड : कराड तालुक्याचे मा. तहसीलदार श्री. विजय पवार साहेब यांनी तालुक्याचा पदभार स्वीकारल्यापासून भारतीय सैन्य दलातील सेवारत सैनिक/माजी सैनिक/त्यांचे कुटुंबीय/शहीद जवान कुटुंबीय यांचे महसूल विभागातील अनेक समस्या आणि अडचणी सोडवून सैनिकांसाठी तारणहार ठरले.
“अमृत वीर जवान अभियान“ राबवणेसाठी महाराष्ट्र सरकारने सन 2022 ला संपूर्ण महाराष्ट्रातील सेवारत सैनिक/माजी सैनिक/ त्यांचे कुटुंबिय/ शहीद जवान कुटुंबिय यांच्या समस्या, अडीअडचणी निवारण करणे, सैनिक मिळावे घेणे, शहीद दिवस साजरे करणे याबाबतचे परिपत्रक सर्व महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुका महसूल विभागाला काढले.
महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या ठिकाणी प्रथम या परिपत्रकाची अंमलबजावणी कराड तालुक्याचे मा. तहसीलदार श्री. विजय पवार साहेब यांनी केली व आजी-माजी सैनिकांच्या समस्या संदर्भात दर महिन्याचे तिसरे सोमवारी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली बोलावली यामध्ये सर्व तालुक्याचे पोलीस विभाग, पंचायत समिती, भुमिअभिलेख, नगरपरिषद, कृषी विभाग अशा अनेक विविध भागातील अधिकारी बोलावून प्रत्येक विभागातील सैनिकांच्या समस्या सोडवण्याचे काम केले सैनिकांना न्याय देण्याचे काम करत आहेत व आज तागायत ते चालू आहे.
भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावत असताना जे जवान शहीद झाले त्यांच्या गावी जाऊन अंत्ययात्रेत स्वतः सहभागी झाले व शासनाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले व त्यांनच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली.
भारतीय सैन्य दलामध्ये जे जवान शहीद झाले त्यांच्या गावी त्यांच्या शहीद स्मारका स्थळी “अमृत वीर जवान“ अभियानांतर्गत शहीद दिवस साजरे केले व त्यांना शासनाच्या वतीने अभिवादन केले त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
कराड तालुक्यातील शहीद जवान कुटुंबीयांना सन 2022 पासून दिवाळीला भेट दिली व त्यांच्या घरी त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांचे कुटुंबीय आई-वडील, वीर पत्नी, मुले यांना संपूर्ण कपडे, मिठाई घेऊन स्वतः मा. तहसीलदार श्री. विजय पवार साहेब यांनी भेट दिली व शहीद जवान कुटुंबीयांचे अश्रू पुसण्याचे काम केले हे अनमोल कार्य आज अखेर चालू आहे. शहीद जवानाच्या आई-वडिलांना विश्वास दिला आज तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला तरी मी तुमचाच मुलगा आहे कधीही मला आवाज द्या मी तुमच्यासाठी उभा आहे असे त्यांनी भावना विचार व्यक्त केले व ते म्हणाले सैनिक हा देशासाठी आपले प्राणाचे बलिदान देतो देश सेवा करतो ते सीमेवर आहेत म्हणून आज देशाची सीमा व आपण सुरक्षित आहोत. मला सुद्धा सैनिकांची व त्यांच्या कुटुंबीयांची सेवा करण्याची संधी मिळत असेल तर ते माझे भाग्य आहे असे विचार व्यक्त केले.
मा. जिल्हाधिकारी सातारा यांनी दिनांक 11/9/2023 रोजी परिपत्रक काढले व त्यामध्ये “सैनिक कक्ष“स्थापन करण्याच्या सूचना दिल्या व या सूचनेची अंमलबजावणी एक कराड तालुक्याचे सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी मा. तहसीलदार श्री. विजय पवार साहेब यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम कराड तालुक्यात“सैनिक कक्ष“ स्थापन केले.
भारतीय सैन्य दलातील देशासाठी बलिदान देणारे शहीद जवान/ सेवारत सैनिक /माजी सैनिक यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मा. तहसीलदार कराड श्री विजय पवार साहेब यांच्या कामाची दखल ही महाराष्ट्र सरकारने घेऊन त्यांचा महाराष्ट्र शासनाने सन्मान करावा अशी मागणी सर्व सातारा जिल्ह्यातील सेवारत सैनिक/माजी सैनिक/त्यांचे कुटुंबीय /शहीद जवान कुटुंबिय यांच्याकडून होत आहे. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा..
– श्री. प्रशांत कदम (माजी सैनिक)
अध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा जिल्हा

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close