ताज्या बातम्याराज्यसातारा

सुंदरगडावर शिवजन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा

कराड : किल्ले सुंदरगड (दात्तेगड) वर  शिवजन्मोत्सवासह शिवयात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपारिक वेशभूषातील शिवकन्या यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेचे पुजन करुन हारफुलांनी सजविलेल्या पाळण्यात प्रतिमा ठेवून छत्रपतीचां सामुहिक पाळणा म्हणला. यावेळी शिवमावळ्यांनी शिवगर्जनेच्या घोषणा देऊन किल्ल्यावर इतिहासीक माहोल तयार केला. या जन्मोत्सव सोहळ्यानंतर सुंदरगडावरुन हारफुलांनी सजवलेल्या पालखीतून शिवप्रतिमेची पारंपारिक वाद्य, झांज पथकाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. या शिवजन्मोत्सव सोहळ्याला शिवमावळ्यांसह शिवकन्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्ये पासून सुंदरगडावर शिवमावळ्यांची शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी लगबग सुरु होती. आदल्या दिवशी गडावर आलेल्या शिवमावळ्यांनी गडाची स्वच्छता केली. गडावरील सर्व देवदैवत्तांचे पूजन करून गड भगव्या पताक्यांनी सजविण्यात आला. रात्रभर सुंदरगडावर शिवज्योतींचे आगमन सुरु होते.  सोमवारी पहाटे गडाच्या खंजीर दरवाजा प्रवेश द्वारात सडा शिपंडून शिवकन्यांनी रांगोळी काढली. बाल छत्रपतींचा पाळणा हारफुलांनी सजविला. व शिवप्रतिमेचे पुजन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी उपस्थित शिवकन्या यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सामुहिक पाळणा म्हणला.
शिवजन्मोत्सव सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची हारफुलांनी सजविलेल्या पालखीतून पारंपारिक पद्धतीने गडावर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मयूर उबाळे आणि सहकारी यांचे जय तुळजाभवानी संबळ पथक, पाटण या मिरवणूकीचे आकर्षण ठरले. यावेळी उपस्थित शिवमावळे – शिवकन्यांनी शिवगर्जनेच्या घोषणा देत गड दणाणून सोडला.
किल्ले सुंदरगडावरील शिवजन्मोत्सव, पालखी सोहळ्यात सुंदरगड संवर्धन समितीचे मावळे शिवप्रेमी मनोहर यादव, माजी सरपंच नारायण डिगे, पिंपळोशी सरपंच विशाल निकम, किसन मांडावकर, नथुराम साळुंखे, वनपरिक्षेत्र जवान निखिल कदम, शंकर मोहिते, लक्ष्मण चव्हाण, राम साळुंखे, संतोष मांडावकर, दिपक साळुंखे, महेश पवार, संजय साबळे, कोमल मांडावकर,  पाटण वनपरिक्षेत्राचे जवान यासह टोळेवाडी- घेरादातेगड, पिपंळोशी, केरळ, पाटण आदी ग्रामस्थ, यांच्यासह गड परिसरातील अबालवृद्धासह, शिवमावळे शिवकन्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close