
कराड : पेरले ता. कराड गावच्या हद्दीत लक्कडवाला शिवाराजवळ ट्रॉलीला व दुचाकीची जोराची धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील एकजण मयत झाला. तर दोघेजण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली . याबाबतची फिर्याद निलेश जगन्नाथ सकटे (वय 20, रा. चोरे, ता. कराड) यांनी उंब्रज पोलिसात दिली असून याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तन्मय राजेेंद्र साळुंखे असे मयत झालेलल्याचे नाव आहे तर मंगेश धनाजी घोरपडे (रा. मत्यापूर) असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे. तर या अपघातात निलेश सकटे व अनिकेत क्षीरसागर हे किरकोळ जखमी झालेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पेरले ता. कराड गावच्या हद्दीत लक्कडवाला शिवाराजवळ पेरले फाटा ते पेरले गावाकडे जाणारे रोडने तन्मय राजेंद्र साळुंखे याचे निलेश व अनिकेत क्षीरसागर असे जात असताना ट्रॅक्टर चालक मंगेश घोरपडे याने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे हयगयीने अविचाराने रिफकलेक्टर लसलेली चारचाकी ऊसाची ट्रॉली दुसर्याचे जिवीतास धोका निर्माण होईल अशी रोडवर उभी करून ट्रॅक्टर घेऊन निघुन गेल्याने दुचाकी ही ट्रॉलीचे समोरील बाजूस कोपर्यावर धडकून अपघात झाला. यामध्ये तन्मय साळुंखे हा गंभीर जखमी होऊन मयत झाला. तसेच दुचाकीवरील निलेश सकटे व अनिकेत क्षीरसागर किरकोळ जखमी झाले. तन्मय साळुंखे याच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक मंगेश घोरपडे याच्यावर उंब्रज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.