
कराड ः वारूंजीतील बंद घर भर दिवसा फोडून चोरट्यांनी तब्बल 10 लाखांचे 20 तोळ्यांची दागिने लंपास केले. शुक्रवारी रात्री उशिरा त्याबाबची फिर्याद आशितोष थोरात (वय 32) यांनी पोलिसात दिली आहे. त्याबाबत पोलिसाची शोध पथके रवाना झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आशितोष थोरात त्यांच्या नातेवाईकांसह शुक्रवारी पहाटे म्हसवडला देवदर्शनसाठी गेले होते. देवदर्शनासाठी निघाल्याने त्यांनी त्यांची आत्त्या आशा साबळे यांनाही बोलावून घेतले. पहाटे निघणार असल्याने यायला वेळ होणार म्हणून आत्यासह थोरात यांनी त्यांच्या पत्नीचेही दागिने लोखंडी कपाटात ठेवले. पहाटे स्वतंत्र गाडीने दरवाजाला कडी कुलूप घालून ते देवदर्शनासाटी गेले. रात्री आठच्या सुमारास ते परतले. त्यावेळी घरात जाताना त्यांच्या लक्षाात आले की, घराचा दरवाजाला कुलुप नाही. त्यानंतर ते नातेवाईकांसह घरात गेले. त्यावेळी त्यांना त्यांचे लोखंडी कपाटाची तपासणी केली. त्यावेळी कपाटात पितळेच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे तब्बल दहा लाखांचे दागिने लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यात त्यांच्या आत्त्याच्याही दागिने होते. तेही चोरट्यांनी लंपास केले होते. त्यात तब्बल सहा तोळ्यांचे दोन लाख 10 हजारांचे मंगळसुत्र, अडीच तेळ्यांचा 87 हजारांचा राणीहार, दोन तोळ्यांची 70 हजारांची सोन साखळी, सहा ग्रॅमची 21 हजारांची ठुशी, पाच ग्रॅमची 17 हजारांची कार्णफुले, सात ग्रॅमची 24 हजार 500 रूपयांची अंगठी, पाच ग्रॅमचे 17 हजार 500 रूपयांचे कानातले झुमके, अडीच तोळ्यांचे 87 हजार 500 रूपयांचे मंगळसुत्र, दोन तोळ्याची 70 हजरांची सोन साखळी, सहा ग्रॅमची 21 हजारांची ठुशी, पाच ग्रॅमची 17 हजार 500 रूपयांच्या कानातल्या कुड्या, एक लाख 57 हजार 500 रूपयांचे साडे चार तोळ्यांचे मंगळसुत्र, पाच ग्रॅमच्या 17 हजार 500 रूपयांच्या कानातील रिंगा, दहा ग्रॅमच्या 35 हजारांच्या 10 ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या, पाच ग्रॅमच्या 17 हजार 500 रूपयांच्या कानातली जोडी, सात ग्रॅमची 24 हजार 500 रूपयांची कानातली जोडी, 60 हजारांची रोख रक्कम असा 9 लाख 56 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे करीत आहेत.
Tags
crime news Karad Satara