ताज्या बातम्याराज्यसातारा

काँग्रेसलाही वैभवाचे दिवस येतील : सुशीलकुमार शिंदे

मुंबई : निवडणुकांमध्ये माझा दोन वेळा पराभव झाला आहे. असं असताना प्रणिती आणि मला भाजपमध्ये या, अशी ऑफर आहे. पण आता ते कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो.

जिथे आमचं बालपण आणि तारुण्य गेलं. त्याला कसं विसरायचं? आता मी 83 वर्षांचा आहे. त्यामुळे आता मी दुसऱ्याचं (भाजपचं) म्हणणं बरोबर आहे असं कसं म्हणणार? तुम्हाला हेही माहिती आहे की, प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही, असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

राजकारणामध्ये असं होत राहतं. हार-जीत होत राहते. पंडित जवाहरलाल नेहरू या माणसासोबत असं झालं. त्यांचाही पराभव झाला होता. त्या पराभव बाबतीत पंडित नेहरू म्हणाले होते की, लहान मुलाला सुरुवातीला आधार देऊन चालवावे लागतं. नंतर तो स्वतः चालतो. चालताना पडतो पुन्हा उठतो. पुन्हा पडतो पुन्हा उठतो…. मग तो चालायला लागतो आणि जेव्हा चालायला लागतो. तेव्हा तो पुन्हा कधी पडत नाही, असं नेहरूंनी सांगितलं होतं. हे उदाहरण एवढ्याकरता आहे की, माणसाला त्रास होतो पण पुन्हा शक्ती मिळते, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

तुम्ही काहीही काळजी करू नका. आज वाईट दिवस आहेत. मात्र ते दिवस निघून जातील. आपल्याला पुन्हा वैभवाचे दिवस येतील. याविषयी माझ्या मनामध्ये खात्री आहे. काँग्रेसला लोकांचा पाठिंबा आहे. काँग्रेसलाही वैभवाचे दिवस येतील, असं शिंदे म्हणालेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close