धनंजय मुंढे चुकले तर त्यांना सुद्धा सोडणार नाही : मनोज जरांगे पाटील

जालना : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे रविवारी (दि.८) मध्यरात्रीनंतर तीन वाजता भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मुंडे आणि जरांगे यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण हे दोन विषय होते. माझी भेट घेण्यासाठी कुणीही अंतरवालीत येऊ शकतो, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. कृषिमंत्री चांगलं काम करत असतील तर त्यांचं कौतुक का करू नये? चुकल्यावर त्यांना सोडणार देखील नाही, असा चिमटादेखील जरांगे यांनी मुंडे यांना काढला. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी मराठ्यांशिवाय कुणाचाही होऊ शकत नाही.
शरद पवार, एकनाथ शिंदे एकत्र येतील की नाही, मला माहीत नाही. आम्हाला निवडणुकीची तयारी करण्याची गरज नाही. फक्त फॉर्म भरण्याची गरज आहे; मात्र निवडणूक लढवायची की नाही, याबाबाबत अजून आमचा निर्णय झालेला नाही, असेही जरांगे म्हणाले.