ताज्या बातम्याराजकियराज्य

महायुतीचे टेन्शन वाढलं, भाजपचा बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

रत्नागिरी: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचं वार उलट्या दिशेने फिरू लागलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा गेल्या दोन तीन वर्षांत भाजपमध्ये प्रवेश करणारे अनेक माजी आमदार, नगरसेवकांसह अनेक पदाधिकारीही पुन्हा आपल्या मुळ पक्षांत परतताना दिसत आहेत.

त्यामुळे महायुतीच टेन्शन मात्र चांगलयचं वाढलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इमकमिंग सुरू आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या गटात जाण्यासाठी अनेक इचछुकांनी रांगा लावल्या आहेत. अशातच कोकणातील भाजपचा बडा नेत्या सध्या उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असून त्यांनी संबंधित नेत्याने त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

रत्नागिरीचे भाजप नेते बाळ माने सध्या ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. नुकतीच ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी बाळ माने आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली आहे.बाळ माने यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केल्यास उद्धव ठाकरे यांची कोकणात ताकद वाढणार आहे. तर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जाणार आहे. बाळ माने हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत बाळ माने यांना भाजपकूडन तिकीट मिळण्याची शक्यता नाही. याचे कारण म्हणजे या मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे उदय सामंत आमदार म्हणून निवडून आले आहेत. महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आमदार त्याच पक्षाला ती जागा मिळणार आहे. उदय सामंत य़ांचे याठिकाणी तिकीट निश्चित झाल्याचेही मानले जात आहेत. त्यामुळे बाळ माने यांना तिकीट मिळण्याची शक्यताही कमी आहे. त्यामुळे बाळ माने नाराज असून दसऱ्यानंतर ते ठाकरे गटात प्रवेश करू शकतात.विशेष म्हणजे बाळ माने हे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे साडू आहेत.

भास्कर जाधव यांनी नुकतीच बाळ माने आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घडवून आणली. यावेळी बाळ माने यांनी रत्नागिरीतून शिवसेनेच्या तिकीटावरून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या इच्छेनंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील ग्रीन सिग्नल दिल्याची माहित आहे. बाळ माने यांना रत्नागिरीतून तिकीट मिळाल्यास उदय सामंत विरुद्ध बाळ माने अशी लढत रंगणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close