
कराड : श्रीमती प्रेमलाताई चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट आणि लायन्स क्लब कराड नक्षत्र यांच्या संयुक्त उपक्रमातून लेखिका दिग्दर्शिका श्रीमती मीना नाईक यांची “अभया” ही पोक्सो कायद्यावर आधारित एकपात्री एकांकिका शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृति सदन (टाऊन हॉल) कराड येथे सादर करण्यात आली. यावेळी या उपक्रमाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल चव्हाण, लायन्स क्लब कराड नक्षत्र च्या ला.गौरी चव्हाण, अध्यक्षा ला. स्मिता हुलवान, लायन्स डिस्ट्रिक्ट चे माजी प्रांतपाल MJF ला. जगदीश पुरोहित, ला. रमेश जाधव, स्नेहा धडवाई (कलाकार), मनोहर शिंदे, संजय बदियाणी, ला. महेश खुसपे, ला. ऍड. सतीश पाटील, ला. प्रा. डॉ. इला जोगी, ला. अर्पणा खोब्रागडे,ला.विद्या मोरे ला.मंजिरी खुसपे, सुरेश पाटील, आदी यावेळो उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, देशात बालकांच्या वाढलेल्या लैंगिक शोषणाच्या घटना सतत घडत आहेत, जी एक अत्यंत गंभीर अशी सामाजिक समस्या आहे. याच घटनांना कायद्याद्वारे आवर घालण्यासाठी आणि या कायद्याचं ज्ञान सर्वसामान्यांना व्हावं हा प्रयत्न सदर एकांकिकेमधून करण्यात आला. “लैंगीक अत्याचाराच्या विरोधात एकांकिकेच्या माध्यमातून समाजाला बोलतं करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. हा उपक्रम गावोगावी तसेच सर्व शाळांमध्ये देखील राबविण्याची गरज आहे.
या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यांचे पालक यांचा उत्साही प्रतिसादात लाभला.
कराडमधील विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. POCSO या कायद्यासंदर्भात बालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम यशस्वी ठरला. यासाठी लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्रच्या ला. गौरी चव्हाण, ला. प्रा. डॉ. इला जोगी, ला. अर्पणा खोब्रागडे, ला.सुजाता पाटील यांनी विशेष प्रयत्न घेतले व सर्व सदस्यांनी खूप सहकार्य केले.