ताज्या बातम्याराजकियराज्य

बांधकाम कामगारांसाठी खुशखबर ! दरवर्षी मिळणार 12 हजार रुपये

मुंबई : ज्यातील घडामोडींना वेग आला असून महायुती सरकारकडून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान आता बांधकाम कामगारांसाठी खुशखबर आहे. आता बांधकाम कामगारांसाठी महायुती सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे.

वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामकागारांना आता निवृत्ती वेतन मिळणार आहे. या योजनेत दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्ती वेतन बांधकाम कामगारांना मिळणार आहे, याबद्दल कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची विधानसभेत घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेला तत्त्वतः मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाने आज कामगार कल्याण आणि प्रशासकीय प्रक्रियांच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध डिजिटल पोर्टल्सचे उद्घाटन करण्यात आलं. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र बांधकाम आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ च्या सेस पोर्टलचे तसेच कामगार विभागाच्या बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंट सिस्टम आणि बॉयलर परीक्षांसाठी डिजीलॉकर सुविधेचे अनावरण यावेळी करण्यात आले.

या वेळी ६० वर्षे वय पूर्ण झालेल्या कामगारांसाठी प्रस्तावित पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेस तत्त्वतः मंजुरी दिली आहे. लवकरच त्यासाठी सविस्तर एसओपी तयार करण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत. याबाबतचे निवेदन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दोन्ही सभागृहात दिले होते. या योजनेत दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्ती वेतन बांधकाम कामगारांना मिळणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close