
कराड : शासकीय जागेतून शासनाकडून गौण खनिज उत्खनासाठी परवानगी घेतली. घेतलेल्या परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्यामुळे ज्यांनी जास्त उत्खनन केले आहे त्यांना शासनाने रितसर दंड केलेला आहे. परंतु या महाभागाने स्वतःला झालेला दंड भरावा लागू नये म्हणून शासनास विविध संघटनेच्या माध्यमातून तसेच उपोषण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरती दबाव तंत्राचा वापर केला आहे.
संघटनेच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजून घेण्यात या महाभागाचा हातखंडाच आहे. समाजाच्या व संघटनेच्या नावाखाली आपल्या नावावरती, वडिलांच्या नावावरती व मुलाच्या नावावरती प्रशासनाकडून गौणखणीच्या उत्खननाच्या मंजुरी घ्यायच्या, प्रशासनाने मंजुरी न दिल्यास त्यांचे विरोधात उपोषण व तक्रारी अर्ज करायचे. ज्यांच्याबरोबर व्यवसाय करायचे त्यांच्याच पाठीत खंजीर खूपसायचा ही परंपराच या महाभागाची आहे. या महाभागाने केलेल्या अनेक कुरापतीचा व शासनाचा दंड बुडवू पाहणाऱ्या महाभागांना लवकरच शासनाकडून व समाजसेवकाकडून चाप बसवला जाणार आहे. चोर तो चोर वर शिरजोर अशा म्हणी प्रमाणे गौण खनिज मध्ये झालेला दंड बुडवू पाहणाऱ्या महाभागाचा लवकरच काही समाजसेवक परदा फाश करणार आहेत. तसेच शासनाने केलेला दंड भरून घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही, अन्यथा वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा समाजसेवकाकडून देण्यात आला आहे.
क्रमशः