
कराड : कराड दक्षिणच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे अतुल भोसले हे नाव आज सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वास, आशा आणि नेतृत्वाचे प्रतीक बनले आहे. आमदार होण्यापूर्वीपासूनच त्यांनी या भागासाठी निधी खेचून आणण्यासाठी घेतलेली धडपड आणि नंतर विधानसभेतून केलेला प्रभावी पाठपुरावा यामुळे कराड दक्षिणच्या विकासाला नवी दिशा मिळाली. जनतेच्या डोळ्यातील स्वप्नांना आकार देण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट हे खरोखरच प्रेरणादायी ठरले आहेत.
परंतु, या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरण्याचे काम काही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून होत असल्याचे गंभीर आरोप पुढे येत आहेत. आमदारांनी जिवाच्या आकांताने आणलेला निधी हा काहीजणांच्या मनमानी आणि स्वार्थी वृत्तीमुळे वाया जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. अनेक विकासकामांमध्ये निकृष्ट दर्जा, अपूर्ण कामे आणि नियमबाह्य अंमलबजावणी यामुळे संतापाची लाट उसळताना दिसत आहे.
अतुल भोसले यांनी जनतेच्या हक्कासाठी लढा देत मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला, मात्र त्या निधीचा वापर करताना काही अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदार यांच्याकडून पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव असल्याचे आरोप होत आहेत. निविदा प्रक्रियेत गोंधळ, कामाच्या अंदाजपत्रकात फेरफार आणि प्रत्यक्ष कामात हलगर्जीपणा यामुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “निधी आणणारा प्रामाणिक, पण खर्च करणारे बेफिकीर” अशी भावना आता जनतेमध्ये निर्माण होत आहे.
विकासाच्या नावाखाली जर निधीचा अपव्यय होत असेल, तर तो केवळ आर्थिक नुकसान नसून अतुल भोसले यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष नेतृत्वाच्या प्रयत्नांनाही कमी लेखणारा प्रकार आहे. जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यातून उभ्या राहिलेल्या अपेक्षा या काहींच्या निष्काळजीपणामुळे धुळीस मिळत असल्याचे चित्र आहे.
या सर्व प्रकारांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून, संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. अतुल भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी जनता आता निधीच्या योग्य वापरासाठीही तितक्याच ठामपणे उभी राहताना दिसत आहे.
कराड दक्षिणच्या विकासासाठी आलेला प्रत्येक रुपया हा जनतेचा आहे आणि तो योग्य पद्धतीनेच खर्च व्हावा, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. अतुल भोसले यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून गैरप्रकारांवर आळा घालावा, अशी जोरदार मागणी आता प्रत्येक नागरिकाच्या आवाजातून उमटताना दिसत आहे.
पुढील भागात – आमदार अतुल भोसले यांनी कापिलच्या रस्त्याला न्याय द्यावा नागरिकांची मागणी?


