
कराड : उंब्रज मंडल अधिकारी हे कधी सिंघम तर कधी जॉनी लिव्हरच्या भूमिकेत वावरत असल्याचे दिसत आहे. मी म्हणतोय तसाच कायदा आहे असे त्यांचे वागणे आहे. कारण उंब्रज मंडल मध्ये कोणत्याही ठिकाणी परवानगी अथवा विना परवानगी मुरुम टाकून भराव्याचे काम चालू असल्यास त्या कामाची कोणतीही लेखी तक्रार आली नसतानाही मंडल अधिकारी उंब्रज हे त्या ठिकाणी पोहोचून त्याचा त्यांना हवा आहे तसा पंचनामा लगेच करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात जमा करून वरिष्ठ कार्यालयाच्या क्लार्कच्या मागे लागून त्या व्यक्तीस दंडाची नोटीस दिली जाते हे काम करत असलेले पाहिल्यानंतर सर्वांनाच सिंघम सारख्या अधिकाऱ्यां सारखे काम करत असल्याचे वाटत आहे.
परंतु ज्यावेळी वीट भट्टी बाबतचा व लाल माती वाहतुकीचा विषय आल्यानंतर हे लगेच जॉनी लिव्हरच्या भूमिकेत दिसतात. या मागचे कारण सर्वांना माहीत आहे.
कराड तालुक्यात उंब्रज मंडल मध्ये सर्वात जास्त वीट भट्ट्याचा व्यवसाय आहे. तसेच तो व्यवसाय करणारे खूप वर्षापासून व्यवसाय करत आहेत. परंतु त्यांनी या वीट भट्ट्याचा व्यवसाय करण्यासाठी बिनशेती आदेश घेतल्याचे दिसून येत नाही. तरीही मंडल अधिकारी उंब्रज यांच्याकडून कोणतीही कारवाई वीट भट्टी धारकावर केल्याचे दिसून येत नाही.
ज्यावेळी तलाठी व मंडल अधिकारी हे उंब्रज मंडलातील चालू असलेल्या वीट भट्टी जागेची बिनशेती आदेश त्या व्यवसायकांनी घेतलेल्या आहेत की नाहीत हा पंचनामा करण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांनी पंचनाम्यात एक महिन्यापासून अनधिकृत बिनशेतीचा वापर सुरू असल्याचे त्यांनी केलेल्या पंचनाम्या वरून दिसून येत आहे. परंतु तहसील कार्यालयात सादर केलेल्या कागदपत्रातील फोटोमध्ये ज्या मालकांची वीट भट्टी आहे त्या ठिकाणचा फोटो जोडलेला आहे. त्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात विटांचा साठा आहे हे दिसून येत आहे. आणि हा साठा पहिला तर एका महिन्यात एवढा मोठा साठा करून ठेवणे शक्य नाही. तसेच उंब्रज मंडल मधील या वीटभट्ट्या किती वर्षापासून चालू आहेत हे सर्वांनाच माहित आहे. तरी याबाबत मंडल अधिकारी यांनी कोणतीच कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही.
तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी वीट भट्टीचा व्यवसाय सुरू आहे त्या ठिकाणचा अनधिकृत बिनशेती वापराबाबतचा पंचनामा तलाठी मंडल अधिकारी यांनी करून तसा तो अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करावा व वरिष्ठ कार्यालयाकडून 1966 चे कलम 45 अन्वये बिनशेतीचा आदेश दिल्या नंतर त्या वीट भट्टी धारकास बिनशेती वापरा बाबतची दंडाची पावती देण्यात येते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ कार्यालयाकडून उंब्रज मंडल मधील विट भट्टी धारकांना बिनशेती आदेश दिलेले नसताना उंब्रज मंडल मधील वीट भट्टी धारकांना तात्पुरती बिन शेतीच्या दंडाची पावती देण्यात आली आहे.
वरिष्ठ कार्यालयाने वीट भट्टी व्यवसायासाठी लागणाऱ्या जागेचा 1966 चे कलम 45 अन्वये बिनशेती आदेश दिलेले नसताना त्या व्यवसायिकास तात्पुरती बिनशेती च्या दंडाची पावती देता येत नसतानाही दंडाची पावती कोणत्या अधिकाराने व कोणाच्या आदेशाने देण्यात आली याची चौकशी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याकडून लवकरच तक्रार दाखल केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
क्रमशः
मंडल अधिकारी उंब्रज यांच्याकडून होत असलेल्या चुकीच्या कार्यपद्धती बाबत…