
कराड : कराड रत्नागिरी राज्यमार्गावर येणपे गावच्या हद्दीत बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मौजे येणपे ता. कराड गावचे हद्दीत झाली. या अपघातात महिला जागीच ठार झाली तर बस मधील इतर 15 ते 18 प्रवाशी गंभीर व किरकोळ जखमी झाले.
वंदना भिमराव शिनगारे (वय 56) रा. कोळे ता. कराड ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर
नारायण पांडुरंग गोखले रा.पुणे, वसुधा वसंत परांजपे रा.चचेगाव, , गणेश बाबुराव कुलकर्णी रा. आगाशिवनगर, विकास शंकर जायचनकर रा. सातारा, काजल जयवंत जाधव रा.लांजा मट, गणेश गोविंद जोशी रा. आळंदी पुणे, दिपीका निलेश गुरव रा.पुणे, निलेश गोपाल गुरव रा. पुणे, सुरज अनिल कोमणे रा. पारस दौंड, दत्तप्रसाद चंद्रकांत गुरव रा. वेलवणमठ, साहिल मधुकर धामणकर रा. लांजामठ, भास्क भुिकशेट कोलडकर रा. जामखेडनगर, अनुजा सुर्यकांत जाधव रा. सातारा, सुनिल लक्ष्मण शिदे रा. कोरेगाव, संजोत दिलीप ठोबें रा. करंजे सातारा, आदेश प्रकाश साळवी, भीमराव यशवंत सुयर्वशी रा. कराड, बाळुताई भीमराव सुर्यवंशी रा. कराड अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात एस.टी बसचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक 18 रोजी रात्री 1 वाजणेच्या सुमारास येणपे ता. कराड गावचे हद्दीत रत्नागीरी ते कराड या रोडवर एस.टी.बस क्रमांक MH 20 BL 1225 चे चालक बसप्पा शंकर सपले रा. जांभळी ता. शिरोळ जिल्हा कोल्हापुर – राजापुर ही बस भरधाव वेगात, निष्काळजीपने चालवत असताना रस्त्याकडे असलेल्या नाल्यात बस पलटी झाली. यात एक महिला प्रवासी ठार झाली तर 18 प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत. हलगर्जीपणे बस चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी बसप्पा संपले यांच्यावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.