
कराड : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त, सह्याद्रि सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऑलम्पिक पद्धतीच्या वार्षिक मानधनावरील कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक माननीय जशराज पाटील (बाबा) यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आखाड्याचे पूजन करून करण्यात आले. यावेळी खुल्या गटातील पैलवान ऋतिक उमापे विरुद्ध सचिन मुळीक यांची कुस्ती मान्यवरांच्या उपस्थितीत सलामी देऊन लावण्यात आली.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कारखाना कार्यस्थळावर कारखाना कार्यक्षेत्रातील तरुणांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि होतकरू पैलवानांना संधी मिळावी यासाठी १९८१ पासून गणेशोत्सव काळामध्ये वजनगटानुसार वार्षिक मानधनावरील ऑलम्पिक पद्धतीच्या कुस्ती स्पर्धा व रोख पारितोषिकाच्या जंगी कुस्त्यांचे खुले मैदान भरवण्यास सुरुवात केली होती, तद्नंतर कारखान्याचे चेअरमन, आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने मैदान भरविण्याची परंपरा सुरू ठेवली असून आज वार्षिक मानधनावरील कुस्त्याना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामने बुधवार दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी खुल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानावेळी घेण्यात येणार आहेत.
दरम्यान पै.सतीश डांगे (विरवडे) यांच्या शुभहस्ते श्री हनुमान प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.
याप्रसंगी डी.बी.जाधव, पै.संजय थोरात, रामदास पवार, संजय कुंभार, बाळासाहेब सूर्यवंशी, दिलीप पवार सर, विनायक पाटील, किरण पवार, सतिष डांगे, आबासाहेब पाटील, सुनील पोळ, दिगंबर डांगे, रघुनाथ पवार, शंकर पोळ, तुकाराम जाधव, आनंदराव चव्हाण, दत्ता ढाणे, सिद्धार्थ चव्हाण, गणेश नलवडे तसेच कुस्तीगीर व कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.