ताज्या बातम्याराजकियराज्य

राहुल गांधी होणार महाराष्ट्राचे दाजी ? ; सोशल मीडियावर चर्चेंना उधान

मुंबई : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लग्न केव्हा करणार? हा प्रश्न प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळातील अनेकांना गेली कित्येक वर्षे पडला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर अलिकडेच त्यांच्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची एकत्र चर्चा सुरु झाली आहे. हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सोशल मीडियात जोरदार रंगली आहे. धक्कादायक म्हणजे मुख्य प्रवाहातील काही प्रसारमाध्यमांनीही या दोघांच्या संभाव्य (?) विवाहाबाबत सूत्रांच्या हवाल्याने वृत्त देण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तवात मात्र अशी कोणत्याही प्रकारची पूसटही माहिती अधिकृतरित्या पुढे आली नाही.

तसेच, काँग्रेस पक्ष अथवा गांधी किंवा शिंदे कुटुंबाकडून तशा प्रकारचे कोणतेही सूतोवाच करण्यात आले नाही. ना कधी स्वत: राहुल किंवा प्रणिती यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तसे बोलून दाखवले आहे.
सोशल मीडियावर चर्चा काय?

राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या विवाहाबाबत सोशल मीडियावर अनेकांकडून अटकळ लावली जात आहे. वास्तवात: या चर्चित आणि कथीत संभाव्य विवाहाबाबत अद्याप कोणत्याही प्रकारे दुजोरा मिळू शकला नाही.

तरीही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवा, असा दावा करतात की काँग्रेस नेते राहुल गांधी पक्षाच्या नेत्या प्रणिती शिंदे यांच्याशी लग्न करणार आहेत. YouTube वरील अनेक व्हिडिओंमध्ये पत्रकार आणि YouTubers राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या शक्यतेवर चर्चा करताना दिसतात. X (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्यांमध्येही या विवाहाबद्दल दोन गट दिसून येतात. यातील पहिला गटक या विवाहाबाबत जोरदार दावा करतो तर दुसरा गट या दाव्यांचे कंडण करतो.

दुसऱ्या गटाच्या दाव्यानसार, महाराष्ट्र आणि देशातील काही घटकांकडून राहुल आणि प्रणिती यांच्याबद्दल जाणीवपूर्वच चुकीच्या बातम्या, अफवा पसरवल्या जात आहेत.

एका X (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्याने म्हटले आहे की, काही लोक राहुल गांधी प्रणिती शिंदे यांच्याशी लग्न करत असल्याच्या अफवा पसरवत आहेत. दुसऱ्याने म्हटले की तथाकथित लग्नामुळे महाराष्ट्रात मोठी राजकीय युती होऊ शकते. तर, “राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे लग्न करणार आहेत का?” असा सवाल करतान तिसऱ्या वापरकर्त्याने विचारला आहे.

या दोघांच्या नावाने सोशल मीडियावर अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार वास्तव असे की, या केवळ असत्यापित अफवा आहेत, ज्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत कोणत्याही नेत्याने अधिकृत घोषणा केलेली नाही. राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून खासदार आहेत, तर प्रणिती शिंदे महाराष्ट्रातील सोलापूरमधून खासदार आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close