
कराड : कराड तहसील कार्यालयाच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कराड तालुक्यातील डोंगर हद्दीतील भागात क्रेशरची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्या क्रेशर व्यवसायाकडून अधिकाऱ्यांना वेळोवेळी पाकिटे देऊन गप्प करण्याचे काम होत असते. मात्र कराड तहसील कार्यालयामध्ये आता नवीन अधिकारी आल्याने त्यांचा नवीन पायंडा पडला आहे. कराडला आजपर्यंत अनेक तहसीलदार येऊन गेले मात्र आजपर्यंत कधीही क्रेशरच्या कामाची माहिती मागविण्यात आली नव्हती मात्र काल अचानक क्रेशरची माहिती मागवल्याची समोर येत आहे. यावरून तहसील आवारात याची खुमासदार चर्चा सुरू आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल तहसील कार्यालयामध्ये तलाठी मंडलाधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीसाठी तहसील कार्यालयातून तलाठी व मंडल अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व क्रेशरच्या लाईट मीटर चा ग्राहक क्रमांक व ते मीटर कोणाच्या नावावरती आहे याबाबतची माहिती घेऊन येण्याबाबत कळवले असल्याची माहिती मिळून येत आहे.
कराड तालुक्यातील आजपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या कडून याबाबत माहिती घेण्याबाबतचे निर्देश दिल्याचे दिसून आलेले नाही. परंतु ही माहिती घेण्यामागची रणनीती काय असू शकते तसेच याचा शासनाला फायदा होणार आहे की अजून कोणाला फायदा होणार आहे. याबाबत तहसील आवारामध्ये चर्चेला उधान आलेले आहे.
क्रमशः
पुढील भागात – लाईट मीटर चा ग्राहक क्रमांक व कोणाच्या नावावरती असल्याबाबतची रणनीती