
कराड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे काम करणाऱ्या कराड तालुक्यातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला अद्यापही देण्यात आलेला नाही. हा मोबदला देण्याबाबत वरिष्ठांकडून टाळाटाळ होत आहे. त्यामागचे नेमके कारण काय आहे. याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
कराड तालुक्यातील महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी केलेल्या अर्जाची छाननी करून approval देण्यासाठी तहसीलदार यांनी दिनांक 31/7/2024 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरील 16 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती.
तसेच तहसीलदार यांनी दिनांक 4/8/2024 रोजी रात्री दहा ते सकाळी सात वाजेपर्यंत 17 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक काम करून कराड तालुक्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम केले. परंतु त्या कामाचा ठरलेला मोबदला आजपर्यंत या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, काही कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा मोबदला मागितला असता तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कराड यांच्याकडे बोट दाखवून उडवा उडवी ची उत्तरे दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या देशात दिवाळी सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु या सणालाही कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक काम केलेल्या कामाचा मोबदला मागितला असता त्यांना तो दिला गेला नाही.
कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक काम केले आहे तर या लोकांना त्यांच्या कामाचा मोबदला देणार की नाही, का त्यांच्या कामाचा मोबदला मधल्या मध्ये खमटला जाणार आहे अशी चर्चा सुरु आहे. जर त्यांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला देणार नसाल तर त्यांच्या नेमणुका करून त्यांच्याकडून दिवस रात्र काम करून घेण्याची आवश्यकता होती का अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
ब्रेकिंग न्यूज लवकरच –
तालुक्यात एकच तहसीलदार असतात पण न भूतो ना भविष्य कराड तालुक्यात तीन तहसीलदार