
कराड : ओगलेवाडी येथील सम्राट लॉजवर दोन महिलांना आणून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या कुंटनखान्यावर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी कुंटनखाना चालवणाऱ्या एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हॉटेलचा व्यवस्थापक विशाल विलास अवधूत, रुम बॉय मुसा मुबारक जामादार, महिला एजंट अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,, ओगलेवाडी येथील सम्राट लॉजवर कुंटनखाना सुरू असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार त्या लॉजवर डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी त्याची खात्री केली. त्यावेळी तेथे महिला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपाधिक्षक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळी, शितल माने, फौजदार अशोक वाडकर, हवालदार महेश शिंदे, प्रवीण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, मयुर देशमुख यांच्या पथकांनी त्याच्यावर वॉच ठेवला होता. सोमवारी सायंकाळी त्या लॉजवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी तेथे हॉटेल व्यवस्थापक व महिला एजंट सापडले. त्यांनी त्यांच्या मार्फत महिलांना
वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे आढळले. त्यात दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली. पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. त्यामध्ये विशाल अवधूत, मुसा जामादार, महिला एजंट यांच्यावर कारवाई सुरू आहे. पोलिस अधिक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधिक्षक वैशाली कडूकर यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोलिसांनी कारवाई केली आहे, अशी माहिती पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकूर यांनी दिली.