
कराड : कराड तहसील कार्यालयातील सेतू केंद्र चालविणाऱ्या सेतू ठेकेदाराची अधिकारी वर्गावर दहशत बसली आहे. जैसा सेतू ठेकेदार बोले तैसा अधिकारी वर्ग चाले असं काहीच चित्र तहसील कार्यालयामध्ये पहावयास मिळत आहे. या सेतू ठेकेदाराच्या विरोधात अनेक तक्रारी असतानाही अधिकारी वर्ग सेतू ठेकेदाराला पाठीशी घालत असून त्याने सांगितल्याप्रमाणे महा-ई-सेवा केंद्राच्या तपासण्या त्याच्या सांगण्यावरून सुरू करण्यात आल्या आहेत. हे म्हणजे अस चोराच्या उलट्या बोंबा या नुसार तहसील कार्यालयात कारभार पहावयास मिळत आहे.
कराड तहसील कार्यालयातील सेतू केंद्रामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार रक्कम घेणे आवश्यक होते. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी व प्रतिज्ञापत्रासाठी 33 रुपये 60 पैसे व नॉन क्रिमिनल दाखल्यासाठी 57 रुपये 20 पैसे घेऊन ऑनलाईन पद्धतीची पावती देणे बंधनकारक असताना कराड सेतू ठेकेदार याने उत्पन्नाच्या दाखल्यासाठी व प्रतिज्ञापत्रासाठी 50 रुपये तसेच नॉन क्रिमिनल दाखल्यासाठी 68 रुपये घेतले जात होते व त्याची त्यांनी तयार करून घेतलेल्या सॉफ्टवेअरची पावती दिली जात होती.
याबाबत तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यांनी याबाबत तहसील कार्यालयामध्ये लेखी तक्रार केल्यानंतर सेतू ठेकेदार याला नोटीस काढून शासनाने ठरवून दिलेली रक्कम घेऊन ऑनलाईन पद्धतीची पावती देण्याचे सांगण्यात आले होते.
तसेच सेतू ठेकेदार यांने शासनाची दिशाभूल करून सामान्य लोकांची फसवणूक करून सेतू ठेका ताब्यात घेतलेल्या दिनांक पासून दि. 20/12/2024 पर्यंत प्रतिज्ञापत्रासाठी व इतर दाखल्यासाठी जी ज्यादा रक्कम घेतली आहे ती त्याच्याकडून वसूल करून घेण्याबाबत काही समाजसेवक यांनी तहसीलदार कराड, यांच्याकडे लेखी तक्रार सुद्धा केलेली आहे.
तसेच सेतू ठेकेदार याची मुदत नक्की केव्हा संपणार आहे याचीही माहिती काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मागितली आहे. परंतु अधिकारी वर्गाकडून याबाबतची चौकशी न करता कराड तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्राची तपासणी सेतू ठेकेदार याच्या सांगण्यावरून केली जात असल्याचे तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये बोलले जात आहे.
तसेच सेतू ठेकेदार याच्या विरोधात एवढ्या तक्रारी अर्ज माहिती अधिकार अर्ज दिलेले आहेत तर त्याच्या विरोधात आजपर्यंत तहसील कार्यालयातील अधिकारी वर्गाने कोणकोणती तपासणी करून त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली आहे याबाबत माहिती द्यावी अशी नागरिकांची मागणी होत आहे. जर असे करण्यात आलेले नसेल तर तहसील कार्यालयातील अधिकारी वर्ग नक्की सामान्य लोकांसाठी काम करत आहेत की सेतू ठेकेदार याला मालामाल करून देण्याचे काम करत आहे.
जर अधिकारी वर्ग सामान्य जनतेसाठी काम करत असेल तर त्यांनी पहिल्यांदा सेतू ठेकेदार याच्या विरोधात झालेल्या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने सेतू विभागाची तपासणी करून त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
क्रमशः