ताज्या बातम्याराज्य

काश्मीरचं नाव बदलणार? अमित शाहांनी दिले संकेत, सूचवलं हे दुसरं नाव

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सूचक विधान केलं आहे. काश्मीरचं नाव कश्यप असं होऊ शकतं, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, शंकराचार्यांचा उल्लेख, रेशीम मार्ग, हेमिष मठ यावरून काश्मीरमध्येच भारताच्या संस्कृतीचा पाया घातला गेला होता, हे सिद्ध होतं. सूफी, बौद्ध आणि शैल मठ सर्वांनी काश्मीरमध्ये चांगल्या पद्धतीने विकास केला आहे.

त्यांनी सांगितले की, कलम ३७० आणि ३५ए देशाला एक होण्यापासून रोखण्याच्या तरतुदी होत्या. संविधानसभेत या कलमांना बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे ही कलमं तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात समाविष्ट करण्यात आली होती. स्वातंत्र्यानंतर या कलंकित अध्यायाला मोदी सरकारने हटवलं आणि विकासाचे रस्ते उघडले.

अमित शाह पुढे म्हणाले की, कमल ३७० नेच काश्मीरमधील तरुणांमध्ये फुटीरतावादाची बिजे रोवली. कलम ३७० ने भारत आणि काश्मीरमधील एकोप्याला तोडलं. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवाद बोकाळला. मात्र आता कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर काश्मीरमधील दहशतवादी कारवाया घटल्या आहेत.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील असेही अमित शाह यांनी ठणकावून सांगितले. त्यांनी सांगितले की, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. त्याला वेगळं करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता. मात्र तो अडथळाही आता हटवण्यात आला आहे. काश्मीरमध्ये जी मंदिरं मिळाली आहेत, त्यांचा उल्लेख पुस्तकामध्ये आहे, त्यामधून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे दर्शवते. लडाखमध्ये तोडण्यात आलेली मंदिरं, काश्मीरमध्ये संस्कृत भाषेचा होत असलेला वापर, काश्मीरमध्ये स्वातंत्र्यानंतर झालेल्या चुका या सर्वांचा उल्लेख या पुस्तकात आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close