
कराड : कराड सेतू केंद्राची मुदत संपल्यामुळे नवीन ठेकेदार नेमणे कामी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ई निविदा मागविण्यात आल्या होत्या यामध्ये रिद्धी कॉर्पोरेटिव्ह सर्विसेस लिमिटेड अहमदाबाद या कंपनीस कराड सेतू केंद्राचा ठेका देण्यात आला होता या अनुषंगाने अध्यक्ष जिल्हा सेतू समिती तथा जिल्हाधिकारी सातारा यांनी दि. 1/1/2022 ते दि. 31/12/2024 या कालावधीसाठी सेतू केंद्राचा ठेका चालवण्याचा आदेश दि. 15/12/2021 रोजी देण्यात आला होता परंतु काही लोकांनी या निर्णयाविरोधात कोर्टात रिट पिटीशन दाखल करून स्टेटस्को घेतला होता.
एकात्मिक नागरी सुविधा केंद्र (सेतू)/आपले सरकार सेवा केंद्र चालविणेस जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि.15/12/2021 चे आदेशान्वये दि. 1/1/2022 ते दि. 31/12/2024 या कालावधीसाठी सेतू चालवण्यास मान्यता देण्यात आली होती तथापि शासनाकडील वाचले क्रमांक चार चे पत्रान्वये सदर विषयाबाबत सद्यस्थितीत स्टेटस्को कायम ठेवण्यात यावा असे निर्देश प्राप्त झाल्याने पात्र ठेकेदार यांचा करारनामा, बँक गॅरंटी, कार्यारंभ आदेश इतर बाबी प्रलंबित ठेवण्यात आलेल्या होत्या.
त्यानंतर कक्षा अधिकारी माहिती तंत्रज्ञान संचलनालय सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांच्याकडील पत्र दि. 26/4/2022 चे पत्रान्वये विषयांकित प्रकरणाचा सद्यस्थिती स्टेटस्को बाबतचे निर्देश मागे घेण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले होते.
त्या पत्राच्या अनुषंगाने त्याअर्थी मी जिल्हाधिकारी शेखर सिंह अध्यक्ष जिल्हा सेतू समिती सातारा तथा जिल्हाधिकारी सातारा शासन निर्णय दि. 23/8/2002 व शासन निर्णय दि. 19/1/2018 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये या कार्यालयाकडील आदेश दि. 15/12/2021 रोजीचे आदेशान्वये सेतू केंद्र चालविणे मंजुरी देण्यात आलेल्या ठेकेदारांना आदेशातील नमूद अटी व शर्ती तसेच रिट पिटीशन क्रमांक 6384/2022 चे आदेशास अधीन राहून कार्यारंभ आदेशाच्या दिनांका पासून पुढील 3 वर्ष किंवा या कार्यालयाकडील पुढील आदेश होईपर्यंत ठेका चालविण्यास कार्यारंभ आदेश देण्यात येत आहे असा आदेश शेखर सिंह अध्यक्ष जिल्हा सेतू समिती तथा जिल्हाधिकारी सातारा यांच्या नावाने दि.4/7/2022 रोजी काढण्यात आलेला आहे परंतु या आदेशावरती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सही केलेली दिसून येत नसून प्रशांत आवटे सचिव जिल्हा सेतू समिती तथा उपजिल्हाधिकारी सातारा यांची या आदेशावरती सही असल्याचे दिसून येत आहे.
जर दि.4/7/2022 रोजीच्या आदेशामध्ये पात्र ठेकेदार यांचे करारनामा व इतर बाबी प्रलंबित ठेवले असल्याचे नमूद केले आहे तर प्रशांत आवटे सचिव जिल्हा सेतू समिती तथा उपजिल्हाधिकारी सातारा यांनी विनायक विश्वनाथ जंगम व्यवस्थापक रिद्धी कार्पोरेटिव्ह सर्विसेस लिमिटेड अहमदाबाद यांच्याबरोबर दि. 5/5/2022 रोजी करारनामा कसा व कोणत्या अधिकाराने केला.
दि. 4/7/2022 पर्यंत पात्र ठेकेदार यांचे करारनामा व इतर बाबी प्रलंबित ठेवल्या होत्या तर प्रशांत आवटे यांनी विनायक जंगम व्यवस्थापक रिद्धी कॉर्पोरेटिव्ह सर्विसेस लिमिटेड अहमदाबाद यांना कार्यारंभ आदेश देण्याआधी 2 महिने आधी करारनामा का करून दिला
तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची दि. 4/7/2022 च्या आदेशावरती सही का नाही तसेच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सहीनिशी काढलेल्या दि. 15/12/2021 रोजीच्या आदेशामध्ये 2 वर्षाचा कालावधी सेतू ठेकेदारांना दिला होता तो प्रशांत आवटे सचिव जिल्हा सेतू समिती सातारा यांनी दि.4/7/2022 रोजीच्या आदेशामध्ये 3 वर्षाचा वाढवून का दिला.
जिल्हाधिकारी यांच्या अधिकारापेक्षा उपजिल्हाधिकारी यांना अधिकार मोठे आहेत का या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी होण्यासाठी काही समाजसेवक लवकरच तक्रार दाखल करणार आहेत.