
कराड : कराड तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांच्या पगार दाखल्याच्या प्रती माहिती अधिकारामध्ये अर्जदाराने मागितल्या होत्या परंतु जन माहिती अधिकारी यांनी ही माहिती वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळे देता येत नाही असा आदेश देण्यात आला होता त्या आदेशाच्या विरोधात अर्जदार यांनी जन माहिती अधिकारी तथा तहसीलदार कराड यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले होते
या प्रथम अपिलाच्या तारखेचे नोटीस अर्जदार यांना मिळाले नव्हते त्यामुळे ते तारखेस हजर राहू शकले नाहीत या कालावधीमध्ये प्रथम अपीलामध्ये अर्जदार गैरहजर असल्याने अर्जदारास अजून एक संधी देणे आवश्यक असताना त्यांनी जाणून-बुजून प्रथम अपील निकालात काढून टाकले आहे
परंतु कराड तहसीलदार यांना माहिती अधिकाराचा पूर्ण अभ्यास नसल्याने त्यांनी चुकीच्या पद्धतीने अपील चालवल्याचे दिसून येत आहे
माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मागवणाऱ्या अर्जदाराकडून काही वेळा संबंधित जन माहिती अधिकाऱ्याची वा प्रथम अपील अधिकाऱ्याची वैयक्तिक माहिती मागितली जाते. वैयक्तिक स्वरूपाची माहिती उपलब्ध न झाल्यास अशा अर्जदाराकडून प्रथम अपील केले जाते. काही वेळा माहिती अधिकाऱ्याकडून वा प्रथम कपिल अधिकाऱ्याकडून त्याच्या स्वतःची संबंधित माहिती मागविण्यात येते तेच अधिकारी असे माहिती अर्ज किंवा अपील अर्ज निकाली काढतात असे निदर्शनास आले आहे. अशा स्वरूपाच्या एका प्रकरणी प्रथम अपील अधिकारी याची वैयक्तिक माहिती मागितली असता त्यांनी त्याप्रकरणी निर्णय दिल्याचे दिसते. No man can be a judge in his own cause न्यायदानाचे मूळ तत्व विचारात घेता स्वतःशी संबंधित असलेल्या प्रकरणात संबंधित माहिती अधिकारी वा प्रथम अपील अधिकाऱ्याने स्वतःच निर्णय घेणे उचित नाही व अशा प्रकरणात संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाने दुसऱ्या जन माहिती अधिकाऱ्याची / प्रथम अपील अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक वाटते. या अनुषंगाने सर्व विभागांना सूचित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तदनुसार शासन पुढील प्रमाणे सूचित करीत आहे.
माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांची /कर्मचाऱ्याची वैयक्तिक माहिती मागवलेली असल्यास संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याने त्याबाबत स्वतःच निर्णय करू नये. अशा माहिती अधिकार प्रकरणी संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाने अन्य जन माहिती अधिकारी वा प्रथम अपील अधिकाऱ्याची त्या विनिर्दिष्ट प्रकरणी नियुक्ती करावी.
हे शासन परिपत्रक क्र. संकीर्ण 2016/प्र. क्र. 155/16 सहा. मंत्रालय मुंबई दिनांक 7/9/2016 रोजी काढण्यात आलेले आहे
जर शासनाच्या नियमाप्रमाणे स्वतःबाबतचा निर्णय स्वतः ला देता येत नसेल तर कराड तहसीलदार यांनी त्यांच्याबाबत मागितलेल्या माहिती अधिकाराचे प्रथम अपील कसे काय चालवून आदेश पारित केला. तर कराड तहसीलदार यांना हे शासन परिपत्रक माहित आहे की नाही याबाबत शंकाच आहे
तरी या आदेशा विरोधात व माहिती अधिकाराचे गांभीर्य अधिकारी/कर्मचारी यांना कळण्यासाठी याबाबत अर्जदार लवकरच तक्रार दाखल करणार आहे.
पुढील भागात – माहितीचा अधिकार अर्जामध्ये अधिकारी/कर्मचारी यांच्या पगाराची माहिती घेता येते का