
कराड ः यशवंतनगर ता. कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र छाननी करण्यात आली. छाननी नंतर एकूण 234 उमेदवारांचे 251 नामनिर्देशन पत्रापैकी 205 उमेदवारांचे 218 अर्ज वैध ठरले आहेत. 29 उमेदवारांचे 33 अर्ज अवैध ठरले आहेत.
दरम्यान अवैध ठरलेल्या 29 पैकी 26 उमेदवारांचे अर्ज त्यांनी मागील पाच गळीत हंगामापैकी किमान तीन हंगामात कारखान्याला ऊस घातला नसल्याने अवैध ठरले आहेत. निवासराव थोरात यांचा अर्ज सहकारी बँकेची थकबाकी असल्याने, तर मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज कलम 88 अन्वये जबाबदारी निश्चित झालेने व जयसिंग नागू जाधव या उमेदवाराच्या अर्जावर सूचकाचा तपशील नसल्याने व अनुमोदक नसल्याने सदर अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे छाननी नंतर 205 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
नामनिर्देशन दाखल करण्याच्या मुदतीत उमेदवारांचे एकूण 251 नाम निर्देशन पत्र दाखल झाले आहेत. गट /मतदार संघ निहाय दाखल नामनिर्देशन पत्र संख्या व छाननी नंतर वैध/अवैध नामनिर्देशन पत्र संख्या पुढील प्रमाणे
गट क्रमांक 1 – कराड मधून एकूण 14 उमेदवारांचे 18 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. त्यापैकी 11 उमेदवारांचे 15 अर्ज वैध ठरले तर 3 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.
गट क्रमांक 2- तळबीड 32 उमेदवारांचे 34 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. त्यापैकी 27 उमेदवारांचे 29 अर्ज वैध ठरले तर 5 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.
गट क्रमांक 3- उंब्रज 30 उमेदवारांचे 31 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. त्यापैकी 28 उमेदवारांचे 29 अर्ज वैध ठरले तर 2 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.
4. गट क्रमांक 4- कोपर्डे हवेली 46 उमेदवारांचे 49 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. त्यापैकी 43 उमेदवारांचे 45 अर्ज वैध ठरले तर 3 उमेदवारांचे 4 अर्ज अवैध ठरले. गट क्रमांक 5- मसूर 40 उमेदवारांचे 42 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. त्यापैकी 37 उमेदवारांचे 37 अर्ज वैध ठरले तर 3 उमेदवारांचे 5 अर्ज अवैध ठरले. गट क्रमांक 6- वाठार किरोली 28 उमेदवारांचे 33 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. त्यापैकी 26 उमेदवारांचे 30 अर्ज वैध ठरले तर 2 उमेदवारांचे 3 अर्ज अवैध ठरले.
अ. जा. /अ. ज. राखीव – 9 उमेदवारांचे 9 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. त्यापैकी 7 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर 2 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.
महिला राखीव राखीव – 14 उमेदवारांचे 14 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. त्यापैकी 10 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.
इ.मा.व. राखीव – 11 उमेदवारांचे 11 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. त्यापैकी 7 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.
वि. जा. /भ. ज./वि. मा. वर्ग राखीव – 10 उमेदवारांचे 10 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. त्यापैकी 9 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर एका उमेदवाराचाअर्ज अवैध ठरला.
शुक्रवार दि.7 रोजी निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात छाननी नंतर वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. अवैध ठरलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 152अ अन्वये प्रादेशिक सहसंचालक (साखर), पुणे विभाग, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे येथे तीन दिवसांचे आत अपील दाखल करता येईल, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा निबंधक संजयकुमार सुद्रीक काम पाहत आहेत.
वैध ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 7 ते 21 मार्च या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत स्वतः उमेदवार किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकृत केलेल्या सूचकामार्फत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. त्यामुळे दिनांक 21 मार्च रोजी दुपारी 3 वाजता माघारी नंतर निवडणूक लढविणारे उमेदवार निश्चित होतील.सदर उमेदवारांना दिनांक 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता चिन्ह वाटप केले जाईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.