
कराड ः गेली तीस वर्षे निवडणूका आल्या की चुना टाकायचा आणि धनगरवाडी हणबरवाडी योजनेचे गाजर जनतेला दाखवायचे. प्रत्यक्षात मात्र कराड उत्तर मतदारसंघातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे पाप माजी आमदार यांनी केल्यानेच जनतेनेच त्यांना सुमारे 44 हजार मतांनी घरपोहोच केले आहे. त्यांनी धनगरवाडी हणबरवाडी योजनेची केवळ चेष्टा चालवली होती. मात्र 2014 साली युतीची सत्ता आल्यानंतर या योजनेला भरीव निधी मिळाला आणि खरी गती मिळाली. त्यामुळेच आमदार झाल्यानंतर केवळ साडेतीन महिन्यातच या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे जलपूजन केले आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे जलपूजन जूनअखेर करू अशी ग्वाही आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दिली.
बहुप्रतिक्षित हणबरवाडी धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा टप्पा क्रमांक 1 चा पाणी पूजन सोहळा गायकवाडवाडी येथे कराड उत्तर विधानसभेचे जलनायक आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महानंदाचे संचालक वसंतराव जगदाळे, सरपंच रेश्मा पवार, महेश जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड, संपतराव इंगवले, मोहनबापू माने, पै. संतोष शेजवळ, विनायक भोसले, जयवंत जगदाळे अशोक जाधव, दिनकर पाटील, नवनाथ पाटील, प्रमोद जाधव, भानुदास पोळ, बाळासाहेब जाधव, जगन्नाथ जाधव, श्रीकांत पाटील, वैभव इंगळे, किसन पाटील, शिवाजी जगदाळे, सुभाष पाटील, आबासो चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. घोरपडे पुढे म्हणाले, कराड उत्तरमधील मसूरचा पूर्व भाग व चोरे विभाग राजकीय प्रगल्भ होऊ नये यासाठी या परिसरातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले होते. मात्र आता पुढच्या दोन वर्षात मतदारसंघातील सर्व योजना पूर्ण करून पाण्याचा प्रश्न निकालात काढू. धनगरवाडी हणबरवाडी योजनेसाठी अनेकांचे योगदान लाभल्यामुळे ही योजना आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. उर्वरित कामाबरोबरच गायकवाडवाडी येथील तलावात पाणी सोडण्याच्या कामास मंजुरी घेतली असून ते कामही येत्या तीन महिन्यात सुरु करू अशी ग्वाही दिली. सह्याद्री कारखान्याच्या बाबतीतही माजी आमदारांनी सभासदांना वेठीस धरले होते. वारस नोंदी न करणे, नवीन शेअर्स न देणे, ऊस जाळून नेणे अशाप्रकारे सभासदांची पिळवणूक होत असून ही परिस्थिती बदलायची असेल तर सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत परिवर्तन करणे आवश्यक आहे. होऊ घातलेल्या निवडणुकीत पाच ते सात हजारांनी आपले पॅनल निवडून येईल व सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा सह्याद्री कारखान्याचा चेअरमन होईल. त्यासाठीही विधानसभेप्रमाणेच सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत जनतेने साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीत तुम्ही मला भरघोस मतदान केले. आपल्या मतदानाच्या कर्जातून विकास कामाच्या माध्यमातून उतराई होण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संपतराव इंगवले, पै. संतोष वेताळ, सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड, श्रीकांत पाटील, प्रमोद जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी माने यांनी केले. सूत्रसंचालन गोरख पवार यांनी केले. तर सर्जेराव पवार यांनी आभार मानले.कार्यक्रमास उपसरपंच जयसिंग पवार, गणेश जाधव, पुरंदर जाधव, युवराज पवार, मनोज पवार, सतीश पाटील, अक्षय पाटील, संग्राम जाधव, जितू मोरे शहाजी मोहिते यांच्यासह माता-भगिनी व परिसरातील विविध गावचे मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
अन् शिवारात पाणी खळखळू लागले….
गेली अनेक वर्ष टँकरचे गाव म्हणून गायकवाडवाडी गावाची ओळख होती. मात्र जलनायक आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यामुळे धनगरवाडी योजनेच्या पहिल्या टप्प्याचे पाणी सुरू झाले. अन् गायकवाडवाडी शिवारात पाणी खळखळू लागले. त्यामुळे माता भगिनींचे चेहरे आनंदाने फुलले आहेत यापुढे टँकरचे गाव ही ओळख शंभर टक्के पुसली जाईल असे मत सरपंच सौ रेशमा पवार यांनी व्यक्त करत आमदार घोरपडे यांना धन्यवाद दिले.