
कराड : कराड तालुक्यात सध्या मलकापूर येथील गृहनिर्माण संस्थेचे प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास सुरू असून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई सुद्धा सुरू आहे. मुळातच ही न्यायप्रविष्ठ बाब असल्याने पोलीस सुद्धा याचा खोल तपास करत आहे. काही ठराविक जणांनी यामध्ये मलिदा लाटण्याच्या उद्देशाने बनावट शिक्क्या द्वारे कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याची चर्चा ही गाजत होती. यामध्ये पोलिसांनी कारवाई जरी केली असली तरी या गृहनिर्माण संस्थेचा खरा भूमाफिया कोण आहे हे जनतेसमोर येणे अपेक्षित आहे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
विश्वसिटी न्यूज च्या हाती लागलेल्या कागदपत्रानुसार व सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका कंपनीत सर्वजण कामाला असल्याने व आयुष्यभर एकत्र राहण्याच्या संकल्पनेतून आपलं हक्काचं व स्वतःच एकाच ठिकाणी सर्वांचं घर असावं हे स्वप्न मनाशी बाळगून जगत असलेल्या सामान्य लोकांनी एकत्र येऊन मलकापूर येथे नियोजित गृहनिर्माण संस्था उभी करण्याचे ठरविण्यात आले होते.
ठरलेल्या नियोजनानुसार मूळचे महसुली गाव कराड व साधारण सण 1979 साली कराड मधून मलकापूर या महसूल गावाचे नवीन निर्मिती करण्यात आली होती या मलकापूर गावातील आगाशिवनगर येथील जुना सर्वे नंबर 617/17 ब त्याचा नवीन 171/17 ई चे मूळ क्षेत्र 3 हेक्टर 31 आर या क्षेत्रामध्ये दोन खातेदार होते त्यापैकी खातेदार तात्या मार्तंडा देवकर यांना 12000 हजार रुपये देऊन त्यांची जमीन खरेदी करण्याचे ठरले.
यासाठी काही लोकांनी पैसे जमा केले व तात्या मार्तंडा देवकर यांना दोन हजार रुपये देऊन या जमिनीचे दस्त क्रमांक 2300 दिनांक 7/10/1974 रोजी रजिस्टर साठेगत करण्यात आले तसेच उर्वरित 10000 हजार रुपये तात्या देवकर यांना देऊन दस्त क्रमांक 786 दिनांक 2/4/1975 रोजी रजिस्टर खरेदीपत्र करण्यात आले.
क्रमशः