
कराड : कराड तहसील कार्यालयात एक ना धड बाराभर चिंध्या अशी अवस्था झाली आहे. गेल्या महिन्यात नवीन तहसीलदार यांनी पदभार स्वीकारला आहे. असे असताना त्या पाठोपाठ काम पाहणारे नायब तहसीलदार हे आपल्या धुंदीत असल्याचे दिसत आहे. कराड तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेले अनेक ग्रामस्थ तहसीलदार नसताना नायब तहसीलदार यांच्याकडे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी जातात. मात्र, सिनेमातील एखाद्या ‘रावडी राठोड’ प्रमाणे यांना ग्रामीण भागातील आलेल्या ग्रामस्थांची एलर्जी असल्याचे दिसून येत आहे. आपल्या मर्जीतील लोकांनाच फक्त केबिनमध्ये बसवून त्यांच्याशी तासंतास गप्पा मारायच्या आणि तालुक्यातून आलेल्या ग्रामस्थांना उद्धटपणे वागणूक देत बाहेरचा रस्ता दाखवायचा हे कितपत योग्य आहे याबाबत तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी लक्ष घालून या महाशयांना आपल्या खुर्चीचा रुबाब झाडण्याऐवजी तालुक्यातून आलेल्या ग्रामस्थांची कामे मार्गी लावावी असा शहाणपणाचा सल्ला द्यावा अशी मागणी तहसील कार्यालयातील आवारात सुरू आहे.
कराड तहसील कार्यालय मध्ये नायब तहसीलदार हे पद खूप महत्त्वाचे असून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे व त्यांना मार्गदर्शन करून त्यांना योग्य पद्धतीने शंकेचे निरसन होईल अशा पद्धतीने पूर्वीचे नायब तहसीलदार काम करत होते. त्यांनी कराड तालुक्यातील जनतेसाठी जे सहकार्य व प्रेम दिले त्याबद्दल कराड तालुक्यातील नागरिक आजही त्यांचे नाव घेत असून त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती देत आहेत.
परंतु सध्याच्या नायब तहसीलदार यांना नागरिकांची व तक्रारदारांची एलर्जी असल्याचे दिसत आहे. कारण कोणत्याही तक्रारदाराचे निरसन झाल्याचे दिसून येत नाही. उलट ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करून तक्रारदारास उडवा उडवीचे उत्तरे देत असून जणू महसूलचा सर्व अभ्यास यांनाच असल्याचे दिसून येत आहे.
परंतु या महाशयांना ठराविक महा ई सेवा केंद्र चालकाना यांचा नेहमीच सपोर्ट करीत असल्याचे दिसून आले आहे. तसेच काही ठराविक महा ई सेवा केंद्र चालकांमधील लोकांच्याकडून त्यांचे स्वतःचे व इतर महा ई सेवा केंद्रामधील आलेले दाखले चेक करण्यासाठी त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली असून त्यांनी चेक केलेले आहे असे सांगितल्यानंतर त्यांच्याकडून कागदपत्राचे पाहणी न करता सह्या केल्या जातात. असे काही नागरिकांच्या निदर्शनात आल्याचे बोलले जात आहे.
त्यातील काही ठराविक महा ई सेवा केंद्र चालकांच्या वरती अन्याय करून त्यांच्याकडील दाखल्या मधील चुका काढल्या जातात. परंतु नायब तहसीलदार यांच्या जवळील नागरिकांच्या कागदपत्रांमध्ये चुका आहेत की नाहीत हेही चेक न करता डोळे बंद करून सह्या केल्या जातात. हे करण्यामागे कराड तालुक्यातील जनता अन्नभिन्न आहे.
क्रमशः