
पाटण : माझ्या आयुष्यात पहिलाच मी असा महोत्सव पाहिला. ज्या भाजीला कोणते औषध नाही, वाईट संगत नाही, नैसर्गिक वातावरणात, शुद्ध हवेत या रानभाज्या येतात. या भागाला विकासाची दिशा देणारेही विक्रमसिंह पाटणकर आहेत अस विधान ना. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
रानभाज्या महोत्सव कोयनानगर याठिकाणी राजाभाऊ शेलार यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केला होता. यावेळी ना. जयकुमार गोरे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री, मा. मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजित सिंह पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, हिंदूराव पाटील, याज्ञसेन पाटणकर, सागर शिवदास, नंदकुमार सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. गोरे बोलताना म्हणाले, कोयना म्हणजे समृद्ध परिपूर्ण भाग असा आमचा समज होता. आज कोयनेकडे येताना पाटण कोयना रस्त्याची काय अवस्था झालेली आहे? मी गेल्या सहा महिन्यात दोन वेळा कोयनेकडे आलो. रस्त्याचे काम जैसे थे आहे. सात वर्षे झाली कोयना रस्त्याचे काम सुरू आहे. आताची स्थिती पाहता अजूनही सात वर्ष काम चालेल अस वाटते. रस्त्याबाबत मी पालकमंत्र्यांशी बोलणार आहे.
कोणाला त्रास मी देत नाही. मी आलोय तर आता सहजासहजी कोणाला सोडणार नाही. याभागातील प्रश्न आज समोर आले. तुमच्या लोकांचे आमच्या वर उपकार आहेत. तुमचे पाणी कसेना कसे आम्हाला आले. ज्या भागात तुळशीच्या लग्नाला ऊस मिळत नव्हता आता त्या जिल्ह्यात पाच साखर कारखाने उभारले आहेत. माण खटाव भागात आम्ही संघर्षमय वाटचाल करुन इथ पर्यंत पोहचलो. तोफेच्या पुढे छातीठोकपणे जातो तोच खरा असतो. इतिहास लिहायला आपण चाललो आहे अनेक संकटे येतात लिहिला तर चांगले आहे नाहीतर पुसुन यायचे या प्रमाणे अतिशय संघर्षमय वाटचाल माझी झालेली आहे.
कार्यक्रमास कोयना विभागातील बचतगट, सहकारी संस्था, दूध संघ, पं. स., जि. प., नगरपंचायत, ग्रामपंचायत आजी माजी पदाधिकारी, महिला, नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक सत्यजित शेलार यांनी केले. सूत्रसंचालन मनोहर यादव आभार बाळा कदम यांनी मानले.