राज्यसातारा

तहसीलदार कल्पना ढवळेंना महसूल विभागातील नातेवाईकांचे अभय? कलम १५० व १५५ च्या शंभरच्या आसपास संशयास्पद आदेशांवर कारवाई का नाही? मंत्रालयातील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या केंद्रस्थानी; नातेवाईक म्हणून मदत करणार की नियमाप्रमाणे निलंबनाची कारवाई करणार? गणेश पवार यांचा थेट सवाल; कारवाई होईपर्यंत आझाद मैदानावरील आंदोलन मागे घेणार नाही!

विश्व सिटी न्यूज विशेष वृत्तमालिका भाग - 140 वा 

कराड : कराडच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळातील कलम १५० व १५५ अंतर्गत देण्यात आलेल्या सुमारे शंभरच्या आसपास संशयास्पद आदेशांचा विषय आता केवळ एका तहसीलदाराच्या कामकाजापुरता मर्यादित राहिलेला नसून, महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेपर्यंत पोहोचला आहे. कल्पना ढवळे यांचे नातेवाईक महसूल विभागाच्या मंत्रालयीन स्तरावर वरिष्ठ पदांवर कार्यरत असल्याने त्यांच्या कार्यकाळातील कथित चुकीच्या कामकाजावर आजपर्यंत ठोस कारवाई झाली नसल्याची चर्चा सध्या महसूल विभागात सुरू आहे. अर्थात, या नातेसंबंधांमुळे कोणत्याही अधिकाऱ्याने हस्तक्षेप केला किंवा कारवाई रोखली, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांच्या नातेसंबंधांची पार्श्वभूमी आणि कल्पना ढवळे यांच्या प्रकरणातील कारवाईची सद्यस्थिती पाहता या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे.

तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळात कलम १५० व १५५ अंतर्गत सुमारे शंभरच्या आसपास चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचे पुरावे आणि आदेश तक्रारदार गणेश पवार यांच्याकडे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी सातारा, विभागीय आयुक्त पुणे, मंत्रालयातील संबंधित सचिव, मुख्य सचिव आणि महसूल मंत्री यांच्याकडे पुराव्यांसह लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणाच्या अनुषंगाने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे. आंदोलन आणि तक्रारींची दखल घेत मंत्रालयातून विभागीय आयुक्तांना कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळातील कलम १५० व १५५ च्या आदेशांची चौकशी करून स्वयं स्पष्ट अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता मंत्रालयातील वरिष्ठ महसूल अधिकारी या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कथित चुकीच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी करून निलंबन व खातेनिहाय चौकशीची कारवाई करण्यासाठी कनिष्ठ अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले जाणार की उलट संबंधित तहसीलदारांना मदत होईल अशा पद्धतीने चौकशी प्रक्रियेवर दबाव आणला जाणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

या प्रकरणात तक्रारदार गणेश पवार यांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारला आहे की, कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळात कलम १५० व १५५ अंतर्गत चुकीचे आदेश दिले गेले असल्याचे पुरावे उपलब्ध असताना आजपर्यंत त्यांच्यावर ठोस कारवाई का झाली नाही? या आदेशांची यापूर्वी चौकशी झाली होती, अशी माहिती समोर येत असेल तर त्या चौकशी समितीला हे कथित चुकीचे आदेश आणि त्यातील त्रुटी का दिसून आल्या नाहीत? दिसून आल्या असतील तर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती? कारवाई प्रस्तावित केली नसेल तर नेमका कोणत्या निष्कर्षाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात मंत्रालयातील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांच्या नातेसंबंधांचा कोणताही प्रभाव पडला आहे का? पूर्वीच्या चौकशीतील त्रुटी किंवा कथित चुकीचे निष्कर्ष कोणाच्या सांगण्यावरून दुर्लक्षित करण्यात आले का? हे प्रश्न आता प्रशासनासमोर उभे ठाकले आहेत.

विशेष म्हणजे, महसूल विभागातील मंत्रालयीन स्तरावर कार्यरत असलेले कल्पना ढवळे यांचे नातेवाईक हे उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज करणारे आणि चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी न घालणारे अधिकारी म्हणून ओळखले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच आता त्यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे. नातेवाईक म्हणून कल्पना ढवळे यांना अप्रत्यक्ष मदत केली जाणार की प्रशासकीय नीतिमत्ता, कायदा आणि शासकीय शिस्त यांना प्राधान्य देऊन त्यांच्याविरुद्ध निष्पक्ष कारवाई होण्यासाठी पुढाकार घेतला जाणार? स्वतःच्या नातेवाईकांबाबतही नियमांनुसार कारवाई होऊ शकते, हे प्रशासन कृतीतून दाखवून देणार का? की या प्रकरणात नातेसंबंधांचा प्रभाव पडल्याचा संशय अधिक बळावणार? हा आता महसूल विभागातील चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप केला असल्याचे पुरावे सध्या समोर आलेले नसले, तरी त्यांच्या भूमिकेबाबत पारदर्शकता ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.

यापूर्वी कल्पना ढवळे यांच्या कार्यकाळातील आदेशांच्या अनुषंगाने झालेल्या चौकशी समितीची भूमिकाही आता तक्रारदारांच्या रडारवर आहे. त्या समितीने नेमक्या किती प्रकरणांची तपासणी केली? सुमारे शंभर प्रकरणांतील आदेश तपासले होते का? कोणते आदेश योग्य आणि कोणते संशयास्पद असल्याचे नमूद केले? कथित चुकीचे कामकाज निदर्शनास आले असेल तर कोणत्या अधिकाऱ्याविरुद्ध कोणती कारवाई प्रस्तावित केली? कारवाईची शिफारस केली नसेल तर त्यामागील कारण काय होते? आणि संबंधित समितीने वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांकडे नेमका कोणता अहवाल सादर केला होता? या सर्व बाबींचा तक्रारदार गणेश पवार आता सखोल अभ्यास करणार आहेत. पूर्वीच्या चौकशी अहवालातील निष्कर्ष, तपासणी केलेली कागदपत्रे, कारवाईच्या शिफारशी आणि प्रत्यक्षात झालेली कार्यवाही यांचा तपशील मिळवून संबंधित चौकशी समितीतील अधिकाऱ्यांविरुद्धही स्वतंत्र लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे आता केवळ तहसीलदारच नव्हे, तर त्यांना मदत केल्याचा पुराव्यांवरून संशय निर्माण होणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची भूमिका तपासली जाणार आहे.

तक्रारदार गणेश पवार यांनी आता स्पष्ट भूमिका घेतली आहे की, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊन त्यांच्या कार्यकाळातील कलम १५० व १५५ च्या संशयास्पद आदेशांची खातेनिहाय चौकशी सुरू होत नाही, तसेच संबंधित चौकशीचा अहवाल सक्षम वरिष्ठ प्राधिकरणाकडे सादर होत नाही, तोपर्यंत आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन मागे घेतले जाणार नाही. याशिवाय या प्रकरणात कल्पना ढवळे यांना कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची भूमिका आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे पुरावे गोळा केले जाणार आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने अधिकारांचा गैरवापर केला, चौकशी प्रक्रियेत हस्तक्षेप केला किंवा उपलब्ध पुरावे जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले असल्याचे कागदोपत्री सिद्ध झाल्यास त्या अधिकाऱ्याविरुद्धही स्वतंत्र लेखी तक्रार दाखल केली जाणार असल्याची भूमिका पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता जबाबदारी निश्चित करण्याची मागणी तहसीलदारांच्या पलीकडे जाऊन मंत्रालयीन स्तरापर्यंत पोहोचली आहे.

सांगली तहसीलदार रंजना उंबरहंडे यांच्यावरील कलम १५५ च्या अनुषंगाने झालेल्या निलंबनाच्या कारवाईचा दाखला देत तक्रारदार गणेश पवार यांनी कराड तहसीलदारांच्या प्रकरणातही समान निकष लागू करण्याची मागणी केली आहे. कलम १५५ च्या प्रकरणात एका ठिकाणी निलंबनाची कारवाई होऊ शकते, तर कराडमध्ये कलम १५० व १५५ अंतर्गत शंभरच्या आसपास संशयास्पद आदेशांचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा असताना कारवाईस विलंब का? मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात निष्पक्ष भूमिका घेऊन विभागीय आयुक्तांना योग्य चौकशी करण्याचे निर्देश देणार की कनिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणून संबंधित तहसीलदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न होणार? पूर्वीच्या चौकशी समितीने नेमके काय तपासले आणि काय दुर्लक्षित केले, याचा हिशेब कोण देणार? नातेवाईक असल्यामुळे कोणालाही प्रशासकीय संरक्षण मिळणार नाही, हे महसूल विभाग कृतीतून दाखवून देणार का? आता हेच प्रश्न मंत्रालयासमोर आहेत. कल्पना ढवळे यांच्यावरील कारवाई, पूर्वीच्या चौकशी समितीची जबाबदारी आणि मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका या तीनही मुद्द्यांवर ठोस उत्तर मिळेपर्यंत आझाद मैदानावरील आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार गणेश पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कराड तहसीलदारांच्या कलम १५० व १५५ प्रकरणाने आता महसूल विभागाच्या मंत्रालयीन वर्तुळातही मोठी खळबळ उडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

पुढील भागात – जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वैशाली राजमाने यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close