
कराड ः सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांना कराड दक्षिण व उत्तर मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे प्रतिपादन कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनिल पाटील यांनी केले.
सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. शशिकांत शिंदे यांनी कराड येथे कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनिल पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सुनिल पाटील बोलत होते. यावेळी सुनिल पाटील यांनी शशिकांत शिंदे यांचे स्वागत करून त्यांना पाठींबा जाहीर केला.
यावेळी तारूखचे माजी उपसरपंच राजेंद्र पाटील, जयराम पाटील, विकास पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचेही सुनिल पाटील यांनी यावेळी सांगितले.