ताज्या बातम्याराजकियराज्य

अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?

बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

कराडला मकोका लागू केला केल्याने प्रकरण अधिकच तापले आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष आणि भाजपचे नेतेही धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

दरम्यान, अजित पवारांनी पक्षातून मोठी कारवाई करताना बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीची अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारिणी विसर्जित केली.पहिल्यांदाच अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात थेट कारवाई केल्याचे बोलले जात आहे. बीडमधील अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी जिल्ह्यातील पक्षाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती दिली होती. दरम्यान, कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून यामध्ये केज तालुक्यात कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. धनंजय मुंडे यांच्या परळी तालुक्यात वैजनाथ सोळंके, तालुकाध्यक्ष बाजीराव धर्माधीकारी, शहराध्यक्ष आणि गोविंदराव देशमुख, परळी विधानसभा अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आष्टी :

काकासाहेब श्रीराम शिंदे – तालुका अध्यक्ष
शेख नाजीम रशीद – शहर अध्यक्ष
डॉ. शिवाजी राऊत – आष्टी विधानसभा अध्यक्ष

पाटोदा :

दिपक दत्तात्रय घुमरे – तालुका अध्यक्ष
गणेश बालासाहेब कवडे – तालुका सहअध्यक्ष

शिरूर :

विश्वास रविंद्र नागरगोजे – तालुका अध्यक्ष
खदीर शेख – शहर अध्यक्ष

बीड :

महादेव विनेश उबाळे – तालुका अध्यक्ष
बाळासाहेब सिताराम गुजर – शहर अध्यक्ष
डॉ. योगेश क्षीरसागर – बीड विधानसभा अध्यक्ष

गेवराई :

भाऊसाहेब कचरू नाटकर – तालुका अध्यक्ष
दिपक आतकरे – शहर अध्यक्ष
पांडूरंग कोळेकर – गेवराई विधानसभा अध्यक्ष

परळी :

वैजनाथ सोळंके – तालुकाध्यक्ष
बाजीराव धर्माधीकारी – शहराध्यक्ष
गोविंदराव देशमुख – परळी विधानसभा अध्यक्ष

वडवणी :

बजरंग दादाराव साबळे – तालुका अध्यक्ष
विठ्ठल भुजबळ – शहर अध्यक्ष

माजलगाव :

जयदत्त नरवडे – तालुका अध्यक्ष
खलील पटेल – शहर अध्यक्ष
विश्वांभर थावरे – माजलगाव विधानसभा अध्यक्ष

केज :

तालुका अध्यक्ष – रिक्त
शहर अध्यक्ष – रिक्त

अंबाजोगाई :

राजेभाऊ बाळासाहेब औताडे – तालुका अध्यक्ष
शहर अध्यक्ष – अलीम शेख
बबनराव लोमटे – केज विधानसभा अध्यक्ष

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय अजित पवार गटाकडून घेण्यात आला आहे. खरे तर आतापर्यंत बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी धनंजय मुंडे यांच्या सल्ल्यानेच नियुक्त होत असत, आता अजित पवार यांनी ही कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याने धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close