
कराड ः पुणे – बंगळूर महामार्गावरील कामास लावलेल्या पोकलेनमधील डिझेल चोरीचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात परप्रांतीय पोकलेन ऑपरेटरचा हात असून त्याच्याविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सुरेंद्र लालबिहारी यादव (मूळ रा. झारखंड, सध्या रा. जखिणवाडी फाटा, नांदलापूर) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी जयदीप सर्जेराव मानसकर (रा. मल्हारपेठ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
जयदीप मानसकर यांचा पोकलेनसह तीन वाहने पुणे – बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामासाठी लावण्यात आली आहे. या वाहनांवर सरेंद्र यादव हा ऑपरेटर म्हणून काम करत आहे. त्याने एका वाहनातील 65 लिटर तर अन्य दोन्ही वाहनांमधील प्रत्येकी 70 लिटर असे एकूण 230 डिझेलची चोरी केली आहे. ही घटना समोर येताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच याप्रकरणी 20 हजार 700 रूपयांचे डिझेल चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वागवे तपास करत आहेत.