
कराड : महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री, लोकनेते स्व. विलासकका पाटील (उंडाळकर) यांची ८७ वी जयंती दिनांक १५ जुलै २०२५ रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त कोयना सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय, लोकनेते विलासकाका पाटील प्रवेशद्वार, मार्केट यार्ड, कराड येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्व. विलासकाका पाटील यांचा जन्म १५ जुलै १९३८ रोजी झाला होता. जिल्हा परिषद सदस्य ते सलग ३५ वर्षे आमदार, तसेच महाराष्ट्र राज्याच्या विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी अतिशय प्रभावीपणे कार्य केले. विशेषतः सहकार क्षेत्रात व ग्रामीण भागाच्या विकासासाठी सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरिता त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी राहिले आहे.
या अभिवादन कार्यक्रमात स्व. विलासकाका यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी तसेच सहकार क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, विविध संस्थाचे प्रतिनिधीं, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मंगळवार दि. १५ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ४.३० या वेळेत अभिवादन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन रयत संघटनेच्या वतीने करणेत आले आहे.
मोफत आरोग्य शिबीर :
लोकनेते स्व. विलासकका पाटील (उंडाळकर) यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक १७ जुलै २०२५ रोजी कराड मार्केट यार्ड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मोफत निसर्गोपचार व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असलेची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.